
मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर ९६ टक्क्यांवर पोहोचला आहे, तर सध्या फक्त ८,४९८ रुग्ण उपचारात आहेत. तर याच्या उलट स्थिती सातारा जिल्ह्यात आहे.
चिंता वाढली! साताऱ्यात 24 तासात रुग्णसंख्या हजार पार
सातारा : मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर ९६ टक्क्यांवर पोहोचला आहे, तर सध्या फक्त ८,४९८ रुग्ण उपचारात आहेत. तर याच्या उलट स्थिती सातारा जिल्ह्यात आहे. दैनंदिन बाधित वाढ 800 ते 900 पटीत सुरू असून ॲक्टिव्ह रुग्ण संख्या दहा हजाराच्या घरात आहेत. जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, 1170 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित (corona patient) आले असून 18 बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी (Health Officer) दिली. (Corona Update 1170 People Report Positive For Coronavirus And 18 Died Today In Satara District)
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या, तर आजअखेर बाधित रुग्णांची संख्या कंसात पुढीलप्रमाणे : जावली 24 (8771), कराड 382 (29702), खंडाळा 54 (12063), खटाव 43 (20096), कोरेगांव 142 (17368), माण 42 (13429), महाबळेश्वर 8 (4343), पाटण 73 (8856), फलटण 61 (28825), सातारा 226 (41578), वाई 101 (13041) व इतर 14 (1416) असे आजअखेर एकूण 199488 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.
तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या, तर आजअखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसात पुढीलप्रमाणे : जावली 1 (182), कराड 8 (901), खंडाळा 0 (153), खटाव 0 (465), कोरेगांव 2 (380), माण 1 (280), महाबळेश्वर 0 (84), पाटण 0 (299), फलटण 4 (465), सातारा 1 (1231), वाई 0 (302) व इतर 1 (70), असे आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण 4812 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, ही रुग्णवाढीची संख्या अशीच वाढत राहिली, तर मोठा धोका निर्माण होणार आहे.
Corona Update 1170 People Report Positive For Coronavirus And 18 Died Today In Satara District