esakal | धोका कायम! साताऱ्यात आत्तापर्यंत 4835 जणांचा कोरोनाने मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus

लॉकडाउनच्या निर्बंधांना वाढता विरोध, कोरोनाच्या पॉझिटिव्हीटीचा चढ-उतार, तिसरी लाट येण्याची भीती आणि लसीकरणाचा उडालेला गोंधळ या अस्वस्थेत प्रत्येक जिल्हावासिय अडकला आहे.

धोका कायम! साताऱ्यात आत्तापर्यंत 4835 जणांचा कोरोनाने मृत्यू

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

सातारा : लॉकडाउनच्या (Coronavirus Lockdown) निर्बंधांना वाढता विरोध, कोरोनाच्या (Coronavirus) पॉझिटिव्हीटीचा चढ-उतार, तिसरी लाट येण्याची भीती आणि लसीकरणाचा उडालेला गोंधळ या अस्वस्थेत प्रत्येक जिल्हावासिय अडकला आहे. त्यातच कोरोनाचा कमी होणारा आकडा पुन्हा वाढू लागल्याने जिल्हावासियांत भीतीचे वातावरण आहे. जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, 1010 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 23 बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी (District Health Officer) दिली. (Corona Update So Far 4835 Civilians Have Died Due To Coronavirus In Satara District)

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या, तर आजअखेर बाधित रुग्णांची संख्या कंसात पुढीलप्रमाणे : जावली 37 (8808), कराड 327 (30029), खंडाळा 17 (12080), खटाव 102 (20198), कोरेगांव 71(17439), माण 59 (13488), महाबळेश्वर 12 (4355), पाटण 45 (8901), फलटण 81 (28906), सातारा 167 (41745), वाई 74 (13115) व इतर 18 (1434) असे आजअखेर एकूण 200498 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.

हेही वाचा: Corona Vaccination : आरोग्य केंद्रात 'वशिला' असेल, तरच मिळणार लस!

तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या, तर आजअखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसात पुढीलप्रमाणे : जावली 0 (182), कराड 2 (903), खंडाळा 0 (153), खटाव 3 (468), कोरेगांव 1 (381), माण 3 (283), महाबळेश्वर 0 (84), पाटण 0 (299), फलटण 5 (470), सातारा 7 (1238), वाई 2 (304) व इतर 0 (70), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 4835 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Corona Update So Far 4835 Civilians Have Died Due To Coronavirus In Satara District

loading image