कोरोनावर मात करण्यासाठी आहार अन्‌ व्यायामाची त्रिसूत्री ठरली फायद्याची : जीवनदास शहा

सुनील शेडगे
Sunday, 27 September 2020

सुरवातीला थोडा धास्तावलो खरा. मात्र, सकारात्मक दृष्टिकोनामुळे वास्तव परिस्थितीला सामोरे गेलो.

नागठाणे (जि. सातारा) : मी प्राथमिक शिक्षक बॅंकेतील निवृत्त अधिकारी. माझ्या पित्ताशयाच्या पिशवीची शस्त्रक्रिया झाली आहे. शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता असते. मात्र, अशा परिस्थितीतही निव्वळ मित्रांच्या प्रेरणेतून मी नियमित 15 किलोमीटर सायकलिंग, एक तास पोहणे, एक तास धावणे, आठवड्यातून एकदा जरंडेश्वर ट्रेक असा कार्यक्रम स्वतःसाठी बनविला आहे. अशातच मी अन्‌ माझ्या मुलावर कोरोनाचे संकट घोंघावले.

सुरवातीला थोडा धास्तावलो खरा. मात्र, सकारात्मक दृष्टिकोनामुळे वास्तव परिस्थितीला सामोरे गेलो. दवाखान्यापेक्षा घरीच विलगीकरणाचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत वैद्यकीय क्षेत्रातील मित्रांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी दिलेले सल्ले कटाक्षाने पाळले. व्यायामाकडे नियमितपणे लक्ष पुरविले. आहार, आसने, प्राणायाम ही त्रिसूत्रीही फलदायी ठरली.

बामणोली आरोग्य केंद्राच्या मदतीला धावला भैरवनाथ

वात्सल्य फाउंडेशनचे अध्यक्ष शशिकांत पवार, डॉ. दीपक निकम, अजय शिराळ, संदीप जाधव, डॉ. काझी, श्री. कदम, सचिन गुजर, अमित घाडगे, श्रीपाद सुतार, सुनील घाडगे, शैलेंद्र कांबळे, अमोल निकम यांचा मोठा आधार लाभला. पत्नी ज्योती, चिरंजीव गौरवसह कुटुंबिय, नातेवाईकांनी काळजी घेतली.

सत्तरीतले शिवाजी घाडगे म्हणतात, डोळ्यांदेखत सहा गेले; पण घाबरलो नाही! 

...अशी घ्यावी काळजी
 

सकस अन्‌ हलका आहार घ्यावा
 
नियमितपणे गरम पाण्याची वाफ घ्यावी
 
गरम पाण्याच्या गुळण्या कराव्यात
 
आयुर्वेदिक काढा तयार करून तो नियमितपणे घ्यावा
 
सकाळ अन्‌ रात्री हळदयुक्त दूध घ्यावे
 
कोरोनावरील अनावश्‍यक चर्चा टाळावा

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronafighter Jeevandas Shah Expressed Views After Recovered From Covid 19 Satara News