esakal | होमआयसोलेशन ठरणार कोरोनावाढीला निमंत्रण; काटेकोर अंमलबजावणीकडे दुर्लक्ष
sakal

बोलून बातमी शोधा

corona

जिल्हा प्रशासनाचे कोरोना केअर सेंटरमध्ये बाधित दाखल करण्याकडे दुर्लक्ष झाले आहे.

होमआयसोलेशन ठरणार कोरोनावाढीला निमंत्रण

sakal_logo
By
प्रवीण जाधव

सातारा : जिल्हा प्रशासनाचे कोरोना केअर सेंटरमध्ये (Corona Care Center) बाधित दाखल करण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. होमआयसोलेशनबाबतही नियमांची काटेकोर अंमलबजावणी होताना दिसत नाही. निर्बंध उठवल्यामुळे बाजारापेठांमधील गर्दी वाढली असताना प्रशासनाचे हे दुर्लक्ष कोरोना संसर्ग वाढीला निमंत्रण देणारे ठरणार आहे.

जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची (Coronavirus) दुसरी लाट अद्यापही कायम आहे. दररोज ४०० ते ५०० नागरिक अद्यापही कोरोनाबाधित आढळत आहेत. राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये लोकसंख्येच्या तुलनेत कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होत असताना साताऱ्यात अशी परिस्‍थिती का, असा प्रश्न सर्वांच्याच मनात उत्पन्न होत आहे. अशातच राज्य पातळीवरून तिसऱ्या लाटेचा इशारा दिला जात आहे. त्यासाठी आरोग्य यंत्रणांना सज्ज राहण्यास सांगितले जात आहे. परंतु, दुसरी लाट पूर्णत: नियंत्रणात आली नसताना जिल्हा प्रशासनाकडून मात्र, कोरोना नियंत्रणाच्या प्रक्रियेकडे दुर्लक्ष होत चालले आहे.

हेही वाचा: मदन भोसलेंची मनमानी, आक्षेपार्ह व्यवहार

दुसऱ्या लाटेमध्ये लावण्यात आलेले निर्बंध प्रशासनाने हटविले आहेत. त्यामुळे बाजारपेठेत नागरिकांची गर्दी वाढली आहे. अशा परिस्‍थितीत कोरोनाबाधित व्यक्ती लोकांमध्ये मिसळले जाऊ नयेत, याची गांभीर्याने दक्षता घेणे आवश्यक बनले आहे. परंतु, त्याबाबतीतच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे. राज्य शासनाकडून सुरवातीपासून होमआयसोलेशन कमी करण्याच्या व कोरोना केअर सेंटरमध्ये जास्तीत जास्त नागरिकांना ठेवले जावे, असे निर्देश दिले गेले आहेत. प्रत्येक गावात असे सेंटर उभे केले जावे, अशाही सूचना होत्या. कोरोनाबाधितांची संख्या जिल्ह्यात वाढलेली असताना प्रशासनाने त्याबाबत धावपळ केली. गावागावांत कोरोना केअर सेंटर उभारली गेले. परंतु, ती कायमस्वरूपी सुरू राहतील, याकडे लक्ष दिले गेले नाही.

हेही वाचा: पुढील तीन दिवस राज्याला धोका; 'या' जिल्ह्यांत 'मुसळधार'

गावोगावचे कोरोना केअर सेंटर बंद पडले आहेत. प्रशासन चालवत असलेल्यापैकी दहा सेंटरही बंद झाली आहेत. जिल्ह्यात सध्या १५ कोरोना केअर सेंटर सुरू आहेत. कर्मचारी कपातीमुळे या सेंटरनाही घरघर लागत आहे. परंतु, सध्या अस्तित्वात असलेल्या सेंटरमध्येही बाधित दाखल होतील, याकडे लक्ष दिले जात नाही. सध्या जिल्ह्यात चार हजार ७९८ ॲक्‍टिव्ह कोरोनाबाधित आहेत. त्यापैकी केवळ ३८२ बाधित हे कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल आहेत. यातून जिल्ह्यामध्ये सुमारे चार हजार ४०० लोक होमआयसोलेशनमध्ये असल्याचे स्पष्ट होते.

हेही वाचा: बंदुकीचा धाक दाखवणाऱ्या तालिबानीसमोर महिलेनं रोखली 'नजर'

आगामी काळात बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता

होमआयसोलेशनसाठी संबंधित बाधिताला स्वतंत्र स्वच्छतागृहाची सोय असलेली खोली असणे आवश्यक आहे. परंतु, अशी परिस्‍थिती फार कमी लोकांची आहे. तरीही त्याची पाहणी न करताच होमआयसोलेशनला परवानगी दिली जात आहे. त्यामुळे बहुतांश ठिकाणी बाधितांसह घरातील अन्य लोक एकत्रित राहत आहेत. हे लोक घराबाहेर फिरत असतात. अनेक ठिकाणी बाधितही बाहेर जात असतो. या गोष्टीवर निर्बंध नसल्यामुळे सहाजिकच जिल्ह्यातील कोरेानाबाधितांची संख्या नियंत्रणात येण्यास मर्यादा येत आहेत. सध्या निर्बंध नसल्यामुळे लोक बाहेर पडत आहेत. या गर्दीत बाधितांचा प्रवेश निर्धोकपणे होत असल्याने आगामी काळात बाधितांची संख्या वाढण्याची संख्या नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने संस्थात्मक विलगीकरणाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

हेही वाचा: फुलांची 'ही' सुंदर पठारं स्वर्गापेक्षा कमी नाहीत

‘‘कोरोनाबाधितांची संख्या कमी करण्यासाठी संस्थात्मक विलगीकरणाचा फायदा होतो. त्यामुळे होमआयसोलेशन कमी करण्याबाबत शासनाचे पूर्वीपासून निर्देश आहेत. त्यानुसार जिल्ह्यात संस्थात्मक विलगीकरण वाढविण्याबाबत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.’’

-डॉ. संजोग कदम, आरोग्य उपसंचालक

loading image
go to top