नगरसेविकेचे पती पुण्याला गेले...घरी परतल्यानंतर कोरोनाबाधित निघाले

रुपेश कदम
सोमवार, 13 जुलै 2020

संबंधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःहून प्रशासनाशी संपर्क साधावा. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्वांनी प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांनी केले आहे.

दहिवडी ः येथील नगरपंचायतीच्या एक नगरसेविका आपल्या पतीसह मुलीचे साहित्य आणायला पुण्याला गेल्या अन्‌ परत येताना त्यांचे पती मुलीच्या साहित्यासह कोरोना घेऊन आले अशी चर्चा गावात हाेऊ लागली आहे. नगरसेविकेची पती कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने दहिवडीत पुन्हा एकदा खळबळ माजली. 

येथील एका नगरसेविकेची मुलगी वाघोली (पुणे) येथे शिक्षणासाठी आहे. लॉकडाउनमुळे संबंधित मुलगी गावी आली होती. त्या मुलीचे साहित्य आणण्यासाठी नऊ 9 जुलैला सकाळी साडेनऊ वाजता स्वतःच्या चारचाकीतून नगरसेविका, पती, मुलगी व चालक यांच्यासह वाघोली (पुणे) येथे गेले. मुलीच्या खोलीवर जाऊन शैक्षणिक साहित्य घेऊन हे सर्वजण त्याचदिवशी परत दहिवडीला आले. त्याचदिवशी रात्री नगरसेविकेच्या पतीला श्वसनाचा त्रास होवून धाप लागू लागली. त्यामुळे दुसऱ्या दिवशी 10 जुलै रोजी त्यांनी ग्रामीण रुग्णालय दहिवडी येथे जावून तपासणी केली. स्वॅबही दिला.

औरंगाबादेत आज 113 रूग्णांना कोरोनाची बाधा,  आता 3 हजार 162 रुग्णांवर उपचार

जास्त त्रास होवू लागल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालय सातारा येथे हलविण्यात आले.  रात्री उशिरा मिळालेल्या अहवालात त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यामुळे दहिवडी शहराच्या चिंतेत भर पडली. निकटसहवासीत असलेल्या चार जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित परिसरात मायक्रो कंटेनमेंट झोन लागू करण्यात आला असून, परिसर सील केला आहे. 

जिल्ह्यात 51 कोरोनाबाधित; जिहे अन् साताऱ्यात दिवसेंदिवस रुग्ण वाढू लागले

"संबंधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःहून प्रशासनाशी संपर्क साधावा. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्वांनी प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे. 
अश्विनी जिरंगे, प्रांताधिकारी 

संपादन -  संजय शिंदे

अन्‌ बाळासाहेब देसाईंचे अश्रू तुकडोजी महाराजांच्या मृत्युपत्रावर पडले!

सावधान ! तज्ज्ञ म्हणतायत कोरोना केवळ फुफ्फुसांवर नाही तर 'या'ही अवयवांवर करतोय हल्ला...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corporator Husband Tested Covid 19 Positive In Dhaiwadi City