

Mahesh Patil addressing the media, demanding investigation into alleged corruption in Limb Gram Panchayat and warning of an indefinite hunger strike.
Sakal
सातारा: लिंब ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक व प्रशासक यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी, अशी मागणी येथील महेश पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे सातारा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे. या मागणीवर येत्या आठ दिवसांत कारवाई करावी, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.