सातारा जिल्ह्यात कोरोना बाधित हजाराच्या उंबरठ्यावर; 24 तासांत 84 रुग्ण वाढले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

नव्याने वाढ झालेल्या या रुग्णांमुळे जिल्ह्यातील बाधितांच्या संख्येने 900 चा टप्पा ओलांडला आहे. जिल्ह्यातील 975 बाधितांपैकी आजअखेर 42 जणांचा मृत्यू झाला असून, 711 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. 

कऱ्हाड ः सातारा जिल्ह्यात कोरोनामुक्तीचा दर वाढत असताना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. जिल्ह्यातील विविध रुग्णालय व कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 47 रुग्णांचा अहवाल शनिवारी (ता.28) पॉझिटिव्ह, तसेच 185 जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली. दरम्यान, आज (रविवार) आणखी 37 रुग्णांची भर पडली आहे. 

शनिवारी सापडलेल्या बाधित 28 रुग्णांमध्ये 21 पुरुष व 7 महिलांचा समावेश आहे. त्यात मुंबई, ठाणे, शाहजहा येथून प्रवास करून आलेले सहा प्रवासी, 18 निकट सहवासित, तसेच चार सारीचे रुग्ण आहेत. बाधित रुग्णांत वाई तालुक्‍यातील कडेगाव येथील 34 वर्षीय पुरुष, पसरणी येथील 48 वर्षीय पुरुष,अमृतवाडी येथील 50 वर्षीय पुरुष, बावधन येथील 57 वर्षीय पुरुष. मायणी (ता. खटाव) येथील 29 वर्षीय पुरुष. सातारा तालुक्‍यातील धावली (रोहोट) येथील 45 वर्षीय महिला, राजापुरी येथील 39 वर्षीय पुरुष, पाटखळ माथा येथील 28 वर्षीय पुरुष. खंडाळा तालुक्‍यातील शिंदे वस्ती- लोणंद येथील 38 वर्षीय महिला, आसवली येथील 27 वर्षीय पुरुष. पाटण तालुक्‍यातील उरूल येथील 60 वर्षीय पुरुष. कऱ्हाड तालुक्‍यातील तारुख येथील वय 21, 22, 27, 28 वर्षीय युवक, तसेच 48 वर्षीय पुरुष व 45 व 50 वर्षीय महिला, चरेगाव येथील चार वर्षीय बालक, 38 व 36 वर्षीय पुरुष आणि 32 वर्षीय महिला, बनवडी येथील 29 वर्षीय पुरुष, कऱ्हाड शहरातील शनिवार पेठेतील 75 वर्षीय पुरुष. नागझरी (ता. कोरेगाव) येथील 26 वर्षीय पुरुष. जावळी तालुक्‍यातील रामवाडी येथील 65 वर्षीय पुरुष व 60 वर्षीय महिला, आखेगनी (रांजणी) येथील 42 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. शनिवारी (ता.28) रात्री उशीरा कऱ्हाड तालुक्‍यातील 15, पाटण तालुक्‍यातील दोन, खटाव व माण तालुक्‍यात प्रत्येकी एक रुग्ण बाधित आढळला आहे. 

दरम्यान, शनिवारी जिल्ह्यातील 218 नागरिकांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठवले. यात सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथील 50, कृष्णा मेडिकल कॉलेज येथील 45, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय येथील 39, फलटण उपजिल्हा रुग्णालय येथील 34, वाई ग्रामीण रुग्णालय येथील 21, शिरवळच्या कोरोना केअर सेंटर येथील दहा, रायगाव येथील 13, मायणी येथील सहा अशा 218 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुणे येथील एनसीसीएस व येथील कृष्णा मेडिकल कॉलेज येथे तपासणीसाठी पाठवले आहेत. दरम्यान आज (रविवार) पुन्हा नव्याने सातारा जिल्ह्यात 37 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

पालकांनी मुलांशी संवाद साधला नाही तर काय घडू शकते, वाचा तेजस्वी सातपुतेंचे मत 

 

 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid 19 Patient Number Reaches 975 In Satara District