एखाद्याला कोरोना झाला, तर त्याची गावभर सेलिब्रेटीपेक्षा जास्त चर्चा व्हायची; पण मी ठरवलं.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sangeeta Kale

एखाद्याला कोरोना झाला, तर त्याची गावभर सेलिब्रेटीपेक्षा जास्त चर्चा व्हायची; पण मी ठरवलं..

सातारा : खटाव तालुक्‍यातील काळेवाडी हे आमचं गाव. तसं खेड्यापाड्यातलं. तालुक्‍याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या गावाला कोरोना हा नक्की काय ते उशिरा कळालं. पण, त्याची दाहकता अन्‌ भीती काय असते, ती गावातील काही लोकांना कोरोना झाल्यावर समजली.

एखाद्याला कोरोना झाला तर त्याची गावात व परिसरात सेलिब्रेटीपेक्षा जास्त चर्चा व्हायची. सुरवातीला बहुतांश बाधित रुग्ण हे होम क्वारंटाइन होऊन उपचार घेत. मग त्यांना एखाद्या खोलीत ठेवायचं. लांबूनच जेवण द्यायचं, त्यांच्या जवळ कोणी जायचं नाही, अशा वागणुकीमुळे वाळीत टाकल्यासारखी स्थिती असायची. त्या कोरोनापेक्षा अनेक विचार डोक्‍यात घोळत असल्याने भीतीनेच कोरोना व्हायच्या आधी अंग गळून जायचं. त्यामुळे आपल्याला कोरोना होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक सर्व काळजीही घेत होते. मात्र, शेवटी त्या कोरोनानं गाठलंच...!

नागरिकांनाे! कुटुंबाच्या सुरक्षेसाठी वेळीच कोरोना चाचणी करा

चार-पाच दिवस कणकणी, थंडी-ताप, बीपी कमी होणे अशा कारणांमुळे फॅमिली डॉक्‍टरकडे उपचार घेतले, तरीही काही फरक पडेना. अनेक जण म्हटले कोरोनाची टेस्ट करून घ्या. पण, कोरोना झाल्यावर... ते नकारात्मक विचार मनात कल्लोळ माजवायचे. त्यामुळे कोरोना टेस्टसाठी माझं काय मन तयार होत नव्हतं. शेवटी भावाने दुसऱ्या डॉक्‍टरकडे जावून उपचार घेऊ, असं म्हणत टेस्ट करून घेतल्या. अन्‌ सिटी स्कॅनही केलं. या सर्व कोरोनाच्या टेस्ट आहेत, हे मला समजलं नव्हतं. नंतर मला सांगितलं की, तुझी कोरोनाची टेस्ट केलीय. किरकोळ आहे. नुकतीच सुरवात झालीय. स्कोरही फक्त दोनच आलाय. पण, मला त्या स्कोरमधलं काय कळतंय. मला एकच कळलं की मला कोरोना झालाय. त्याच्या भीतीने डोकं सुन्न झालं. त्या नकारात्मक विचारांनी मी जमिनीवरच कधी कोसळले ते मलाही समजलं नाही. शेवटी भाऊ व चुलत मामाच्या मुलाने मला धीर दिला. त्यांनी माझी मानसिक तयारी करत कोरोनाला तू हरवायचंच असं सांगितलं.

शाब्बास! गावच्या पोरांनी करुन दाखवलं; WhatsApp मधून गोळा केली 'आरोग्य'साठी लाखोंची मदत

मीही म्हटलं आपल्याला कोरोना होऊनही हे दोघे आपल्या जवळ आलेत. मग मी पण सर्व नकारात्मक विचारांना तिलांजली देत मनाची तयारी केली अन्‌ कोरोनाशी दोन हात करायला तयार झाली. ज्या डॉक्‍टरकडे गेली, त्यांनीही माझ्या मनातली पहिली भीती काढून टाकली. ते स्वत: जवळ येऊन तपासू लागले. नाही तर कोरोना झालेल्या व्यक्तीच्या जवळ जायला तसे सर्वच भीतात. पण, डॉक्‍टरांनी आपुलकीने विचारपूस करत धीर दिला. होम क्वारंटाइन ठेऊन औषधोपचाराने मला त्यांनी कोरोनामुक्त केले. कोरोना हा खरा तर मानसिक आजार वाटतो. फक्त भीतीपोटी आजपर्यंत निम्म्या बाधितांचे जीव गेले आहेत. नातेवाईकांनी बाधितांना तुच्छतेने न वागवता आपुलकी, प्रेम दाखवून त्यांना धीर दिला तर भीतीपोटी मृत्यू होण्याचे प्रमाण कित्येक पटीने कमी होऊ शकते आणि राहिलेले उपचाराने. त्यासाठी कोरोनाबाधितांना आपुलकी व प्रेम द्या, तुमच्या या वागणुकीमुळे ते लवकर कोरोनामुक्त होतील.

Edited By : Balkrishna Madhale

Web Title: Sangeeta Kale Of Kolwadi Village Defeated The Corona Virus Satara

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top