

ASHA workers unpaid for seven months in Maharashtra
sakal
-हेमंत पवार
कऱ्हाड: तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकांना गेल्या सात महिन्यांपासून केंद्र सरकारचे, तर दोन महिन्यांपासून राज्य सरकारचे मानधनच मिळालेले नाही. त्यामुळे त्यांच्यासमोर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा तरी कसा? हा प्रश्न उभा असून, त्यांच्यावर औषधालाही महाग होण्याची वेळ आली आहे.