लहान मुले ठरु शकतात सुपर स्प्रेडर; सिव्हीलसह 'चिरायू'त उपचार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Childrens

लहान मुले ठरु शकतात सुपर स्प्रेडर; सिव्हीलसह 'चिरायू'त उपचार

सातारा : कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका लक्षात घेऊन प्रशासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सातारा शहरातील चिरायू हॉस्पिटलमध्ये लहान मुलांसाठी 10 बेडचे कोरोना हेल्थ केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे. त्यामध्ये चार ऑक्‍सिजन बेड, तर सहा सर्वसाधारण बेडची उभारणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील विविध तालुक्‍यांत नवीन दहा कोविड हॉस्पिटलनाही जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे.

कोरोनाच्या संकटात लहान मुलांना होणारा धोका लक्षात घेऊन एक महिन्यापूर्वी शहरातील क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयात चिल्ड्रन वॉर्ड तयार केला होता. त्यानंतर आता कोरोनाबाधित बालकांसाठी चिरायू हॉस्पिटलमध्ये वॉर्ड तयार करण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात काही लहान मुले कोरोनाबाधित झाल्याचे आढळून आल्याचे दिसून आले, तर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जादा धोका असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडूनही विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. नव्याने होणाऱ्या हॉस्पिटलमुळे लहान मुलांना तत्काळ उपचार मिळणे सोपे होणार आहे.

हेही वाचा: Mothers Day Special : आईसाहेब माझी पाॅवर बॅंक : उदयनराजे

हेही वाचा: लस येताच सिव्हीलला नागरिकांची धाव; कोव्हॅक्‍सिन अत्यल्प

दरम्यान, जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने बेडची संख्या अपुरी पडत आहे. त्यामुळे उपचाराअभावी अनेक रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांना बेड उपलब्ध होण्यासाठी नागठाणे, निढळ, लाईफ केअर (कऱ्हाड), यशवंतराव चव्हाण (कऱ्हाड), पुष्कर हॉल (सातारा), चिरायू (सातारा, डीसीएसची), नवजीवन (सातारा डीसीएचसी), सुखांजनी हॉस्पिटल (वाई), उत्कर्ष लॉज (फलटण), जितराज (कोरेगाव) या ठिकाणी नव्याने कोविड हॉस्पिटल होणार आहेत.

सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचा

नव्या सेंटरमध्ये 490 बेड उपलब्ध होणार

जिल्ह्यातील कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन नव्याने 10 हॉस्पिटलला परवानगी देण्यात आली आहे. त्यामध्ये 490 बेड उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे इतर रुग्णालयांवरील ताण कमी होणार असून, रुग्णांनाही तत्काळ उपचार मिळणार आहेत.

हेही वाचा: काळजी मिटली! काेराेनाबाधित मुलांसाठी सिव्हीलला स्वतंत्र वॉर्ड

हेही वाचा: बालरोगतज्ज्ञ म्हणतात, तिसऱ्या लाटेत लहान मुले बनू शकतात सुपर स्प्रेडर ! अशी घ्या खबरदारी

Web Title: Covid19 Hospital Children Satara Marathi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Satara
go to top