काेराेनातून मुक्त झाले अन् ऑक्सिजन मशिनसह मतदानासाठी पाेचले

vote
vote

काले (जि. सातारा) : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज (मंगळवार) मतदानासाठी सभासदांचा उत्साह दिसून आला आहे. या निवडणुकीसाठी सकाळपासून मतदारांच्या विविध केंद्रावर रांगा लागल्या हाेत्या. मतदान करण्यासाठी ज्येष्ठांसह महिलांची उपस्थिती माेठ्या संख्येने हाेती. काले येथील महात्मा गांधी विद्यालय येथे काेविड 19 मधून बरे झालेल्या एका सभासदाने आॅक्सिजन मशिनसह केंद्रावर दाखल हाेत मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान प्रशासनाने काेविड 19 रुग्णांना मतदान करण्यासाठीचा शेवटचा अर्धा तास ठेवल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश आष्टेकर व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मनोहर माळी यांनी दिली. (covid19-patient-voted-krishna-sugar-factory-election-2021-satara-marathi-news)

कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीसाठी तिन्ही पॅनेलमधील दिग्गजांचे भवितव्य आज (मंगळवार) सभासद मतदानातून ठरवत आहेत. मतदारांचा कौल नेमका कोणाला हे एक जुलै रोजी मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. आज सायंकाळ पाच वाजेपर्यंत 148 मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया चालणार आहे. बहुतांश मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया सुरळीत सुरु आहे. ज्या सभासदांना काेविड 19 ची लागण झाली आहे. अशा सभासदांना मतदान करता यावे यासाठी प्रशासनाने पॅनेल प्रमुखांसह मतदान केंद्राध्यक्षांना विशेष सूचना केल्या आहेत. यामध्ये शेवटचा अर्धा तास काेवड 19 रुग्णांसाठी असेल. जेथे जास्त गर्दी असेल तेथे दुपारी चारपासून मतदानाची सुविधा ठेवण्यात आली आहे.

vote
साता-यात 21 काेविड बाधितांचा मृत्यू; पालकमंत्री चिंतेत

काले (ता. क-हाड) येथील महात्मा गांधी विद्यालय मतदान केंद्रावर काेविड 19 मधून बरे झालेल्या एका रुग्णाने मतदान केले. त्याच्या साेबत असलेल्या प्रतिनिधीने मतदानाचा हक्क बजावल्याचे केंद्रावरील केंद्राध्यक्षांनी नमूद केले. दरम्यान राज्याचे सहकार राज्य मंत्री विश्वजीत कदम यांनी दुपारी काले येथील मतदान केंद्रास भेट दिली. त्यांनी मतदान केंद्राचे अधिकारी यांच्याशी संवाद साधला. तिन्ही बूथला भेट देत मतदानाची माहिती घेतली. त्यावेळी त्यांनी युवा नेते नानासाहेब पाटील सोबत होते. त्यांच्याशी त्यांनी संवाद साधला. या केंद्रावर उपस्थित असलेले युवा नेते विवेक पाटीलसह सहकार पॅनेलचे उमेदवार दयाराम पाटील यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते भिमराव (दादा) पाटील यांची तब्येतीची चौकशी केली. कोरोनात सर्वांनी काळजी घ्या सल्लाही त्यांनी दिला. संस्थापक पॅनल उमेदवार पांडुरंग पाटील यांचीही सदिच्छा भेट घेतली.

Vishwajeet-Kadam
Vishwajeet-Kadam
vote
कृष्णा कारखाना निवडणुक: सहकारसह संस्थापक पॅनेलवर गुन्हा दाखल

यावेळी शिवराज मोरे व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी दयाराम पाटील यांच्या भेटी दरम्यान सारे काही मतदाराच्या हातात आहे. असं म्हणत सर्वांची हसत मुखाने नमस्कार घालत संवाद साधला. त्यांच्या भेटीने तिन्हीही पॅनलच्या उमेदवारांसह कार्यकर्त्याच्यामध्ये दुपारची मरगळ दूर झाली. सर्वत्र त्यांच्या भेटीची चर्चा पहावयास मिळाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com