अल्पवयीन मुलीला फसवल्याप्रकरणी महाबळेश्वरात दोघांवर गुन्हा

महाबळेश्वर परिसरातील एका अल्पवयीन मुलीने काहीच दिवसांपूर्वी बाळाला जन्म दिला. या अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी घरीच या मुलीची प्रसूती केली.
Crime
CrimeSakal

महाबळेश्वर - महाबळेश्वर परिसरातील एका अल्पवयीन मुलीने काहीच दिवसांपूर्वी बाळाला जन्म दिला. या अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी घरीच या मुलीची प्रसूती केली. या पीडितेने एका मुलीला जन्म दिला व ही नवजात मुलीस मुंबई येथील चौरसिया कुटुंबियांना देण्यात आले होते. मात्र हे पीडित कुटुंब तक्रार देण्यास पुढे येत नव्हते. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शीतल जानवे खराडे यांनी नातेवाईकांना विश्वासात घेत न्याय मिळवून देण्याचा विश्वास दिल्यानंतर महाबळेश्वर पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीच्या आईने तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी सागर उर्फ आबा हनुमंत गायकवाड वय ३० व आशुतोष मोहन बिरामणे वय २२ रा मुन्नवर हौ. सोसा, महाबळेश्वर यांना ताब्यात घेतले असून या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, महाबळेश्वर शहरानजीक राहणारी पीडित मुलगी ही अल्पवयीन आहे हे माहित असताना देखील तिच्यासोबत तिच्या इच्छेविरुद्ध व संमतीशिवाय शरीरसंबंध केले. त्यामध्ये पीडित मुलगी ही गरोदर राहिली होती. या पीडितेची प्रसूती नातेवाईकांनी १३ सप्टेंबर रोजी घरामध्येच केली. त्यानंतर नवजात मुलीच्या जन्माबाबतची माहिती लपवण्याचा हेतूने नवजात मुलीस मुंबई येथील चौरसिया कुटुंबियांना देण्यात आले. हे पीडित कुटुंब तक्रार देण्यास पुढे येत नव्हते. याबाबतची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. शितल जानवे - खराडे यांना अज्ञात खबऱ्याकडून मिळाली. त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला व अल्पवयीन पीडितेसह तिच्या नातेवाईकांना विश्वासात घेत न्याय मिळवून देण्याचा विश्वास दिला.

Crime
पाटणला 355 स्थलांतरित अनुदानासाठी 'अपात्र'; प्रशासनाचा अजब निर्णय

या पीडित मुलीने व तिच्या कुटुंबियांनी सर्व हकीकत उपविभागीय अधिकारी डॉ.शितल जानवे यांना सांगितली. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ शीतल जानवे खराडे,पोलीस निरीक्षक संदीप भागवत यांच्या प्रयत्नाने अखेर पीडित मुलीच्या आईने मंगळवारी रात्री उशिरा महाबळेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी सागर उर्फ आबा हनुमंत गायकवाड वय ३० व आशुतोष मोहन बिरामणे वय २२ रा. मुन्नवर हौ.सोसा, महाबळेश्वर यांना ताब्यात घेतले आहे. त्या दोघांविरुद्ध भादंवि ३७६, ५०६, ३४ पोक्सो ४, ६, १७ सह जुवेनाईल जस्टीस ॲक्ट २०१५ चे कलम ८०, ८१, ८७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा तपास पो. नी. संदीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अब्दुल बिद्री हे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com