कॉल्स डिटेल्सवरून खुनी संशयितांना ठोकल्या बेड्या

मसूरपासून जवळच्या गायकवाडवाडीतील युवकाबरोबर घडलेली अत्यंत दुर्दैवी घटना. एका युवकाने ज्यांना पैसे दिले होते, तेच त्याचे सगेसंबंधित त्याच्या मृत्यूस कारण ठरले
crime dairy police arrested criminals from call details satara
crime dairy police arrested criminals from call details satarasakal
Summary

मसूरपासून जवळच्या गायकवाडवाडीतील युवकाबरोबर घडलेली अत्यंत दुर्दैवी घटना. एका युवकाने ज्यांना पैसे दिले होते, तेच त्याचे सगेसंबंधित त्याच्या मृत्यूस कारण ठरले

मसूरपासून जवळच्या गायकवाडवाडीतील युवकाबरोबर घडलेली अत्यंत दुर्दैवी घटना. एका युवकाने ज्यांना पैसे दिले होते, तेच त्याचे सगेसंबंधित त्याच्या मृत्यूस कारण ठरले होते. सांगली जिल्ह्यातील कडेगाव भागातील एक महाराज होते. त्यांची गायकवाडवाडीतील तरुणांशी ओळख होती. त्या ओळखीचे रूपांतर व्यवहारात झाले. त्या व्यवहारातून गायकवाडवाडीच्या तरुणाने त्यांना चार लाखांहून अधिक रक्कम उसनी दिली. ती रक्कम काही ठराविक कालावधीत परत करण्याचा शब्द होता. त्या शब्दाला तो महाराज जागला नाही. किमान दहा ते पंधरा वेळा दिलेला शब्द पाळला नाही. त्याने दिलेले पैसे परत न करण्याचा त्याचा बेत होता. अखेर पैसे परत न करता त्याचा काटा काढण्याचा निर्धार त्या महाराजाने केला. त्याने संबंधित युवकाला पैसे देतो, असे म्हणत कऱ्हाडात आणले. कऱ्हाडच्या फ्लॅटमध्ये त्यांची पार्टी झाली. त्या पार्टीत सगळेच दारू पिले. महाराजासोबत त्याचे दोन मित्रही होते. त्या मित्रांना संबंधित युवकाचा खून करायचा आहे, याची कल्पना होती. ठरलेही तसेच होते.

दारू जास्त झाल्याचे लक्षात येताच त्याच्या एका मित्राने त्याच्या डोक्यात बाटली फोडली. त्यानंतर त्यांनी त्याला मरेपर्यंत मारला. तो मेल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी एका मोठ्या वाहनात त्याचा मृतदेह ठेवला. त्यानंतर वाहन विशाळगडाकडे वळले. त्याचवेळी त्यांनी केलेल्या प्लॅनिंगप्रमाणे ज्याचा खून झाला आहे. त्याचा मोबाईल घेऊन एकाने थेट अकलूज भाग गाठला. मोबाईल लोकेशनमुळे आपण सापडू नये, अशी त्यांनी जय्यत तयारी केली होती. त्यात ते आठ महिने यशस्वी झाले. तोपर्यंत इकडे संबंधित युवकाच्या नातेवाईकांनी त्याच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली. त्याचा घातपात झाल्याचा संशय पोलिसांजवळ व्यक्त केला. त्या खुनाचा तपास उंब्रज व सातारा एलसीबीने केला. तो बेपत्ता होता, तेव्हापासूनचे पोलिसांनी त्याचे फोन कॉल डिटेल्स, त्याचा सिडीआर तपासला त्यावेळी संबंधित युवक बेपत्ता होईपर्यंत ज्यांच्याशी बोलत होता. त्या सगळ्यावर पोलिसांनी वॉच ठेवला. ज्या दिवशी युवक बेपत्ता झाला, त्या रात्रीचे सगळ्यांचे लोकेशन एकत्रित कऱ्हाड हेच दाखविले.

त्यामुळे पोलिसांचा आणखी संशय बळावला. पोलिसांनी डायरेक्ट महाराजाला उचलले. त्याच्याकडे चौकशी केली. तो सुरवातीला काहीच बोलला नाही. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखवताच तो बोलला अन्‌ पोलिसांच्या जाळ्यात अडकला. सातारा गुन्हे प्रकटीकरण विभागाने खून उघडकीस आणल्यानंतर पोलिसांनी संबंधित युवकाच्या मृतदेहाचे अवशेष विशाळगडनजीक गजापूर गावचे हद्दीत टेंभुर्णेवाडी येथील कोकण पॉइंटवर खोल दरीत पोलिसांना आढळले. उंब्रज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जोतिराम गुंजवटे, सहायक पोलिस निरीक्षक बजरंग कापसे, हवालदार पी. सी. देशमुख, एल. एम. जगधने, सतीश मयेकर, भुजबळ यांचे पथकाने विशाळगडाच्या जंगलात मृतदेहाचा शोध लावण्यात यश मिळविले. त्यात तिघांना अटक आहे. उसने दिलेले पैसे परत करायचे नव्हते, त्याच वादातून युवकाचा खून झाल्याचे पोलिसांनी उघडकीस आणले. पोलिसांच्या पथकाने कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड परिसरात त्यावेळी दोन दिवस दऱ्यात शोध घेतला. त्यावेळी त्यांना आंबा ते विशाळगड रस्त्यावर गजापूर गावचे हद्दीत टेंभुर्णेवाडी येथील कोकण पॉइंटच्या दरीत मृतदेहाचे अवशेष आढळून आले. तेथून सुमारे साठ मीटर खोल दरीत खून करून मृतदेह टाकला होता. त्यावेळी मध्यरात्री प्रकार केला होता. त्यामुळे संशयित सोबत असूनही त्यांना ती जागा व्यवस्‍थित दाखवता आली नव्हती. मृतदेह फेब्रुवारी २०१८ ला सापडला होता. त्यापूर्वी सुमारे आठ महिने अगोदर खून झाला होता. दरीत केवळ शरीराची हाडे व अन्य काही शिल्लक अवशेष कुजलेल्या स्थितीत पोलिसांना आढळून आले होते. अंगात घातलेली जीन्स व टी शर्ट मिळाला आहे. त्यावरून खात्री झाली. तरीही पोलिसांनी सापडलेले अवशेष पुणे येथील न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते. त्याचाही अहवाल आला होता. त्यावरूनही खात्री झाली होती.

उसने पैसे देणाऱ्याचा काटा काढून त्याचा मृतदेह विशाळगडाच्या दरीत टाकणाऱ्या चार नराधमांचा उंब्रज पोलिसांनी सुमारे चार वर्षांपूर्वी पर्दाफाश केला. गायकवाडवाडीतील युवकाच्‍या खुनानंतर तब्बल आठ महिन्यांनी शोध लावण्यात पोलिसांना यश आले. त्यावेळी मृतदेह सडक्या अवस्थेत मिळाला. त्या युवकाचा मृतदेह पोलिसांनी न्यायवैद्यकीय तपासणीनंतर सिद्धही केला. त्यामुळे उसने पैसे परत न करता पैसे घेणाराच मृत्यूदूत ठरल्याचे पोलिस तपासात उघड झाले. सातारा गुन्हे प्रकटीकरण विभागासह उंब्रज पोलिसांनी त्यात अथक परिश्रम घेतले. खबऱ्यांसह मोबाईलचे रेकॉर्ड, सीडीआर, एकमेकांना झालेले फोन कॉल्सचे डिटेल्स यांसह अनेक पातळ्यांवर तपास करून पोलिसांनी चौघांना अटक केली. सिनेमाच्या कहाणीप्रमाणे झालेली घटना शोधण्यासाठी पोलिसांना तब्बल आठ महिन्यांचा कालावधी लागला.

तपासाचा त्रिवेणी संगम

चार वर्षांपूर्वी झालेल्या खुनाचा तपास त्यावेळी पोलिस आठ महिने करत होते. त्यामुळे तब्बल वर्षभराचा मागोवा घेऊन खुनाचा छडा लावण्याचे अवघड काम पोलिसांनी केले होते. ते आव्हान त्यांनी तितक्याच ताकदीने पेलले. त्यासाठी सातारचे गुन्हे प्रकटीकरण विभाग, उंब्रज पोलिस व पोलिसांचे खबरे, मोबाईलचे डिटेल्‍स अन्‌ सीडीआर असा तपासाचा त्रिवेणी संगम झाल्याने अत्यंत क्‍लिष्ट बनलेल्या खुनाचे बिंग फुटले आहे. त्यात तीन संशयितांनाही अटक आहे. अत्यंत गांभीर्याने परिस्‍थितीजन्य पुरावे उभे करत पोलिसांनी त्या खुनाची कडी जोडली. खुनानंतर युवकाचा मोबाईल अकलूजकडे तर मृतदेह विशाळगडकडे नेवून काहीही संबंध नसल्याचा डाव उभा करण्याचे षडयंत्रही पोलिसांनी हाणून पाडल्याचे स्पष्ट दिसते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com