esakal | आगाशिवनगरला मारामारीत 36 जणांवर गुन्हा; पोलिसांकडून गंभीर दखल I Satara
sakal

बोलून बातमी शोधा

Malkapur Police Station
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व नवरात्र उत्सवाच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू केला आहे.

आगाशिवनगरला मारामारीत 36 जणांवर गुन्हा; पोलिसांकडून गंभीर दखल

sakal_logo
By
राजेंद्र ननावरे

मलकापूर (सातारा) : चौकात येण्या-जाण्याच्या कारणावरून काल रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास दांगट वस्ती, आगाशिवनगर येथे दोन गटांत मारामारी झाली. पोलिस वेळीच घटनास्थळी पोचल्याने पुढील अनर्थ टळला. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या ३६ जणांवर शहर पोलिस ठाण्यात (Malkapur Police Station) गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिस नाईक शशिकांत खाडे यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून ३६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल सुनील देवकांत (वय २७), बुद्धभूषण सुनील देवाकांत (२३), सुलभा सुनील देवकांत (४९), अश्विनी राजेश देवकांत (२८), ओंकार नारायण दरागडे (१८), अनिल दिनकर दरागडे (४०), सविता अनिल दरागडे (३०), सागर शंकर दरागडे (३०), गंगू नारायण दरागडे (४०), ओंकार दिलीप दरागडे, दिग्विजय दिलीप दरागडे, दिलीप दरागडे, सुमन थोरात, नामदेव देवकांत, राजू देवकांत, साहिल देवकांत, सुनील देवकांत, अनिल देवकांत, रेखा थोरात, भूषण देवकांत, करण थोरात, भरत दरागडे, दीपक थोरात, पौर्णिमा थोरात, रमेश दरागडे, राजाबाई माने, सुशीला माने, गंगू दरागडे, गणेश सातपुते, अक्षय अवघडे, अनिल चव्हाण, अजित माने, ऋतिक माने, विशाल लोंढे, सोमनाथ चव्हाण, विशाल देवकांत (सर्व आगाशिवनगर, झोपडपट्टी, मलकापूर ता. कऱ्हाड) असे गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत.

हेही वाचा: प्रियकरासोबत आईचं 'सैराट' पलायन; मुलीनं थाटला मुलाच्या बापाशीच 'संसार'

याबाबत पोलिसांनी सांगितले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व नवरात्र उत्सवाच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात संचारबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे. दरम्यान, असे असतानाही दांगट वस्ती आगाशिवनगर येथे भांडण सुरू असल्याची माहिती पोलिसांना समजली. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत भांडण करणाऱ्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. मात्र, तरीही दोन्ही बाजूकडील जमाव शांत राहात नव्हता. दोन्ही बाजूकडून भांडण करणाऱ्यांची संख्या वाढतच गेली. ते एकमेकांना लाथाबुक्क्यांनी, हाताने मारहाण करत होते. पोलिसांनी सांगूनही मारामारी करणारे ऐकत नसल्याने नाइलाजास्तव पोलिसांनी आणखी फौजफाटा मागवला. संशयितांना ताब्यात घेण्यासाठी पोलिस व्हॅनही बोलावून घेतली. पोलिस व्हॅन दिसताच भांडण करणारे सर्व जण घटनास्थळावरून पळून गेले. त्यामुळे पोलिसांनी स्वतः तक्रार देऊन दोन्ही बाजूच्या ३६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक राहुल वरुटे करत आहेत.

हेही वाचा: जिल्ह्यात या, मग कळेल; फडणवीस, पाटलांना गृहराज्यमंत्र्यांचं चोख प्रत्युत्तर

loading image
go to top