esakal | चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीवर जीवघेणा हल्ला; पतीची रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या I Wathar Station
sakal

बोलून बातमी शोधा

Wathar Police

अजय व पूजा यांचा विवाह दहा वर्षांपूर्वी झाला होता.

चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीवर जीवघेणा हल्ला

sakal_logo
By
अतुल वाघ

वाठार स्टेशन (सातारा) : वाठार स्टेशन (ता. कोरेगाव) येथे चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीवर जीवघेणा हल्ला करुन पतीने रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या केली. काल पहाटे झालेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. वाठार पोलिसांनी (Wathar Police) दिलेल्या माहितीनुसार, अजय राजेंद्र उर्फ राजाराम भिसे (वय ३५, रा. रविवार पेठ वाई) व पूजा अजय भिसे (वय २५) यांचा विवाह दहा वर्षांपूर्वी झाला होता.

२९ सप्टेंबरला रात्री अजय व त्याची पत्नी पूजा यांच्यामध्ये भांडण झाल्याने पूजा ही गुरुवारी पुणे येथे निघून गेली. त्यानंतर माहेरी वाठार स्टेशन (Wathar Station Village) येथे वडिलांना भांडण झाल्याचे सांगितल्यावर पुजाची बहीण सुजाता घोलप व तिची आई रंजना दोरके या दोघी पूजाला वाठार स्टेशन येथे आणण्यासाठी पुणे येथे गेल्या. पुणे येथून काल साडेचार वाजता वाठार स्टेशन येथे आल्या. पती अजय भिसे याला आपली पत्नी वाठार येथे माहेरी आल्याचे समजल्यानंतर तो काल रात्री एक वाजता सासरी वाठार स्टेशन येथे आला.

हेही वाचा: अपहरणाचा खोटा बनाव; सेना नेत्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न

दरम्यानच्या काळात कौटुंबिक वादाविषयी चर्चा होत असताना पहाटे पाचच्या सुमारास अजयने किचनमध्ये असलेली कुऱ्हाड हातात घेऊन कॉटवर झोपलेल्या पत्नीच्या तोंडावर व पाठीवर जीवे मारण्याच्या उद्देशाने वार केले. त्यानंतर तिथून पलायन करून पहाटे सहा वाजता पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेच्या खाली आत्महत्या केली. पूजा हीस सातारा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर करीत आहेत.

loading image
go to top