esakal | अपहरणाचा खोटा बनाव; सेना नेत्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न I ShivSena
sakal

बोलून बातमी शोधा

Shekharbhau Gore

पोलिसांना खोटी माहिती देऊन शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांना अडकविण्याच्या प्रयत्नातून अपहरणाचा बनाव केला आहे.

अपहरणाचा खोटा बनाव; सेना नेत्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न

sakal_logo
By
सल्लाउद्दीन चोपदार

म्हसवड (सातारा) : स्वतःच्या अपहरणाचा खोटा बनाव करून शिवसेनेचे नेते शेखरभाऊ गोरे (ShivSena leader Shekharbhau Gore) यांना विनाकारण अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवरच म्हसवड पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केलाय. डॉ. नानासोा शिंदे यांच्यासह अन्य दोघांवर खोटी माहिती देवून खरी माहिती लपवल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. याबाबतचा अधिक पोलिस करत आहेत.

म्हसवड पोलिसांनी (Mhaswad Police) दिलेल्या माहितीनुसार, मागील काही महिन्यांपूर्वी माण तालुक्यातील पानवण येथील घडलेल्या अपहरण प्रकरणाच्या गुन्ह्यातील एकंदरीत तपासात २७ फेब्रुवारी २०२१ रोजी रात्री नऊ ते साडे दहाच्या दरम्यान, पानवण (ता. माण) हद्दीत पानवण ते ढाकणी जाणाऱ्या रोडवर कुंभेरीची वगळी जवळील पुलावर डॉ. नानासाहेब शिंदे (वय ५७), संजय किसन शिंदे (वय ३६), संतोष किसन शिंदे (वय ३५) सर्व रा. पानवण (ता. माण) यांनी आपसात संगनमत करून डॉ. नानासोा शिंदे यांच्या अपहरणाचा बनाव करून डॉ. शिंदे यांनी स्वतःच गाडी (एम.एच १४ डी.ए.४००४) च्या शीटवर डिझेल ओतून पेटवून दिली, असा खोटा पुरावा तयार केल्याचे तपासात निष्पन्न झालेय.

हेही वाचा: राजकारणात ज्यांच्यावर विश्वास टाकला, त्यांनीच दगा दिला

दरम्यान, त्यांनी घडल्या प्रकाराबाबत पोलिसांना खोटी माहिती देऊन शिवसेनेचे नेते शेखर भगवान गोरे यांना अडकविण्याच्या प्रयत्नातून अपहरणाचा बनाव केला आहे. त्यानुसार डॉ. नानासोा आण्णा शिंदे, संजय किसन शिंदे, संतोष किसन शिंदे (सर्वजण रा. पानवण ता. माण) यांच्याविरुद्ध भा.द.वि कलम 435,176,177,182,193,195(अ),196,34 प्रमाणे तक्रार दाखल झाली आहे. याबाबतचा अधिक तपास वरिष्ठांच्या सूचनेनुसार, म्हसवड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बाजीराव ढेकळे यांच्या मार्गदर्शनाखाली आर. व्ही. डोईफोडे करत आहेत.

हेही वाचा: अजित पवारांनी आमच्या आज्ञेचं पालन करावं : उदयनराजे

loading image
go to top