सिनेस्टाइल पाठलाग करून फरारी गुन्हेगारास पकडले | Crime | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Criminal Arrested

सिनेस्टाइल पाठलाग करून फरारी गुन्हेगारास पकडले

sakal_logo
By
किरण बोळे

फलटण शहर - बलात्कारासह विविध गंभीर गुन्हे दाखल असलेला व गेल्या दोन वर्षांपासून फरारी असलेल्या गुन्हेगाराचा सिनेस्टाईल पाठलाग करून फलटण ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. संदीप धनाजी भोसले (रा. निंबळक, ता. फलटण) असे संबंधिताचे नाव आहे. सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी केली आहे.

संदीप भोसले याच्यावर फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात बलात्कार, बालकांचा लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमासह विविध कलमांन्वये गंभीर गुन्हे दाखल आहेत. गुन्हा दाखल झाल्यापासून भोसले हा गेली दोन वर्षे पोलिसांना गुंगारा देत होता. बरड पोलिस दूरक्षेत्राचे सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे हे पोलिस अंमलदार गणेश अवघडे व अन्य पोलिस कर्मचाऱ्यांसह रात्रगस्तीसाठी फिरत होते. त्या वेळी सोनवणे यांना भोसले हा त्याच्या घरी येणार असल्याची माहिती मिळाली.

हेही वाचा: एसटी कर्मचाऱ्यांत तुंबळ हाणामारी; वाहकानं नियंत्रकाच्या डोक्यात घातला दगड

माहिती मिळताच त्यास पकडण्यासाठी वाजेगाव (ता. फलटण) येथे सापळा लावण्यात आला. भोसले हा तेथे आल्यावर पोलिस गाडी पाहून त्याने तेथून पळ काढला; परंतु सोनवणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याचा दोन किलोमीटर अंतर सिने स्टाइलने पाठलाग करून त्यास जेरबंद केले.

पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अजित बोराडे, पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे, पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सोनवणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी केली आहे.

loading image
go to top