
Shirwade: Crocodile sighted in Krishna River, panic among villagers and fishermen.
Sakal
कोपर्डे हवेली : शिरवडे (ता. कऱ्हाड) गावानजीक स्मशानभूमी परिसरात कृष्णा नदीपात्रात काल दुपारी मगरीचे दर्शन झाले. त्यामुळे स्थानिक मासेमारी करणाऱ्यासह ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे. यापूर्वी परिसरात बिबट्याच्या दर्शनाने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. त्यात मगरीच्या दर्शनाने लोकांच्या भीतीत आणखी भर पडली आहे.