esakal | Karad : टेंभूजवळ कृष्णा नदीत मगरीचा मुक्त संचार
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

Karad : टेंभूजवळ कृष्णा नदीत मगरीचा मुक्त संचार

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड : कृष्णा नदीच्या पात्रात टेंभू गावाजवळ तेथील ग्रामस्थांना मगरीचे दर्शन झाले. त्यामुळे परिसरात घबराट पसरली आहे. दरम्यान, ग्रामस्थांनी नदीकाठावर जाताना दक्षता घ्यावी, शक्यता नदीकडे जाण्याचे टाळावे, असे आवाहन ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा: अफगाणिस्तानात मशिदीत शक्तीशाली बॉम्बस्फोट, ५० जणांचा मृत्यू

कृष्णा नदीकाठावर टेंभू गाव वसले आहे. त्या गावाजवळुन नदी वाहत असल्याने अनेकजण नदीला आंघोळीसाठी जादात. दरम्यान तेथील काही ग्रामस्थांना कृष्णा नदीच्या पात्रात मुक्तपणे संचार करताना मगरीचे दर्शन झाले. त्यामधील काही ग्रामस्थांनी मोबाईलमध्ये मगरीचे चित्रीकरण केले. हा व्हिडीओ टेंभू परिसरात व्हायरल झाला.

हेही वाचा: MobiKwik आणणार 1900 कोटींचा IPO, SEBIची मंजुरी

मगरचे वास्तव्य नदीपात्रात असल्याचे समजल्यानंतर या परिसरात घबराट पसरली आहे. वन विभागाने मगरीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.दरम्यान, नदीकाठावर जाताना ग्रामस्थांनी स्वत:ची काळजी घ्यावी. सुरक्षेच्या कारणास्तव शक्यतो नदीकडे जाण्याचे टाळावे, असे आवाहन टेंभू ग्रामपंचायतीने केले आहे.

loading image
go to top