सातारा : वीजजोडण्या तोडल्याने पिकांचे नुकसान

वीजबिल थकलेल्या कृषिपंपांच्या जोडण्या खंडित करण्याचा महावितरणचा धडाका
satara
satarasakal

सातारा : गेल्या १५ दिवसांपासून ग्रामीण भागात वीजबिल थकीत असणाऱ्या कृषिपंपांच्या जोडण्या खंडित करण्याचा धडाका महावितरण कंपनीने लावला आहे. ५० टक्के वीजबिल भरले तरच वीजजोडण्या पूर्ववत करण्याचा इशाराच शेतकऱ्यांना दिला आहे. या प्रकारामुळे पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिके जळून नुकसानही होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्र वीज वितरण कंपनीकडून सुरवातीला शेती, व्यावसायिक, घरगुती जोडणी, कृषिपंप आदींची वसुली करण्यास सुरवात केली होती. यामध्ये शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा देण्यासाठी व वसुलीही लवकर होण्यासाठी महावितरण विभागाने योजना सुरू करत हप्त्या-हप्त्यात थकीत रक्कम भरण्यास सवलत दिली होती.

satara
५० टक्के रक्कम भरा, कृषीपंपाचं वीजबिल माफ

या योजनेला ग्रामीण भागातील नागरिकांनी प्रतिसाद दिल्याने महावितरणची काही प्रमाणात थकीत वसुली झाली. मात्र, त्यानंतर उर्वरित थकीत बिले वसूल न झाल्याने महावितरणने वीजजोडणी तोडण्यास सुरुवात केली आहे. महावितरणच्या सवलत योजनेत सप्टेंबर २०२० पर्यंतच्या वीजबिलावर ५० टक्के सूट असून, त्यानंतरची रक्कम पूर्ण भरावी लागणार आहे.

दरम्यान, अवेळी पडणारा पाऊस व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दिवाळीचा सण झाल्यानंतरही मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने सोयाबीन व ऊसतोडीवरही प्रचंड परिणाम झाल्याचे पाहावयास मिळाले. या परिस्थितीतून शेतकरी उभारी घेत असताना महावितरणने कृषिपंपांच्या जोडण्‍या खंडित करण्यास सुरुवात केली. या प्रकारामुळे शेतकरी पुरता अडचणीत आला आहे.

satara
वीजबिल दुरुस्ती नंतर थकबाकीच्या ५०% रक्कम २०२० अखेरपर्यंत भरावी : औटी

चुकीची बिले शेतकऱ्यांच्या माथी

महावितरण कंपनी बहुतांश कृषिपंपांच्या मीटरमधील रीडिंग न घेता अंदाजे बिले शेतकऱ्यांच्या माथ्यावर मारत आहे. मीटरमधील रीडिंग व प्रत्यक्षात बिलांवरील रीडिंगमध्ये खूप फरक असल्याचे अनेक बिलांमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे महावितरण जादा रीडिंग लावून चुकीच्या पद्धतीची वसुली करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com