esakal | साताऱ्यात वादळी वाऱ्यासह धुवांधार; गोंदवले, दहिवडी, कातरखटावात पिकांचे नुकसान
sakal

बोलून बातमी शोधा

Crop Damage

साताऱ्यात वादळी वाऱ्यासह धुवांधार; गोंदवले, दहिवडी, कातरखटावात पिकांचे नुकसान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : राज्यात आठवडाभर पावसाळी वातावरण कायम राहणार, तर काही भागांत दुपारपर्यंत निरभ्र आकाश आणि त्यानंतर अंशत: किंवा सामान्यत: ढगाळ स्थिती राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. सातारा जिल्ह्यात आज जोरदार पावसाने (Rain) हजेरी लावत पिकांचे (Crop Damage) मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. जिल्ह्यातील गोंदवले, दहिवडी, मलवडी, बुध, कातरखटाव या भागात वरुणराजाचा जोराचा वर्षाव पहायला मिळाला. (Crop Damage Due To Rain In Satara District)

यंदा मान्सूनचे आगमान 1 जूनला केरळमधून होणार आहे. त्यामुळे मान्सूनपूर्व शेतीच्या कामांना वेग येणार आहे. मान्सून 10 जूनपर्यंत तळकोकणात दाखल होईल, तर 15 ते 20 जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्र व्यापेल, असा अंदाज हवामानने वर्तवण्यात आला आहे. मान्सून केरळनंतर सामान्यत: पाच-सहा दिवसांमध्ये महाराष्ट्रात दाखल होतो, त्यामुळे त्याचे महाराष्ट्रातील आगमन कधी होणार याबाबत उत्सुकता आहे.

राज्यातील 'या' सहा जिल्ह्यांवर अस्मानी संकट; कऱ्हाडात धुवांधार

आज माण तालुक्याच्या पूर्व भागातील म्हसवड, देवापूर, पुळकोटी, वरकुटे, पळशी इत्यादी गावांत वादळी वा-याच्या तडाख्याने मोठ-मोठी झाडे मुळासकट उन्मळून पडली, तर उभी पिके भुईसपाट झाली आहेत. तसेच आब्यांनी बहरलेल्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा पाऊस असाच सुरु राहिला तर शेतकरीराजा देशोधडीला लागणार आहे. दरम्यान, राज्यात पावसाची स्थिती पुढील आणखी दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

Crop Damage Due To Rain In Satara District