esakal | राज्यातील 'या' सहा जिल्ह्यांवर अस्मानी संकट; कऱ्हाडात धुवांधार
sakal

बोलून बातमी शोधा

Rain

राज्यातील 'या' सहा जिल्ह्यांवर अस्मानी संकट; कऱ्हाडात धुवांधार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : सध्या वादळी वाऱ्यासह अवकाळीने राज्यात थैमान घालायला सुरुवात केली असून राज्यावर कोरोनाचे संकट असताना आता अस्मानी संकटाला सुद्धा तोंड द्यावे लागत आहे. येत्या तीन ते चार तासात उस्मानाबाद, लातूर, कोल्हापूर (Kolhapur), सोलापूर, सातारा (Satara) आणि सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस (Rain) पडण्याची शक्यता वर्तविली असून या अस्मानी संकटात घराबाहेर न पडण्याचा इशारा वजा विनंती हवामान खात्याने केली आहे. (Rains Begin In Osmanabad Latur Kolhapur Satara Districts)

रविवारी, सोमवारी राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. साताऱ्यात झालेल्या मुसळधार पावसात खंडाळा आणि माण तालुक्यात वीज पडून 3 जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोन ठिकाणी वीज पडून मंदिर आणि घराचे नुकसान झाले आहे. त्यामुळे येत्या तीन तासात सातारा जिल्ह्यात असेच चित्र पहायला मिळणार असून कराड तालुक्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.

रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांत मुसळधार पाऊस; 'हवामान'चा अंदाज

अवकाळी झालेल्या पावसामुळे लोकांची एकच त्रेधातिरपट उडाली. कऱ्हाड शहरासह तालुक्याच्या विविध भागात आज बुधवारी वादळी वाऱ्यासह वळिवाच्या पावसाने हजेरी लावली. दुपाची साडेचारच्या सुमारास सुरु झालेल्या पावसाचा जोर मोठा होता. विजांच्या कडकडाटात झालेल्या पावसाने हवेत गारवा निर्माण केला.

Rains Begin In Osmanabad Latur Kolhapur Satara Districts