esakal | जिल्ह्यात ३५ टक्के शेतकऱ्यांकडून पीक पाहणी
sakal

बोलून बातमी शोधा

Satara

जिल्ह्यात ३५ टक्के शेतकऱ्यांकडून पीक पाहणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : शेतकऱ्यांना मोबाईल ॲपद्वारे पीक पाहणी नोंदविण्याची सोय राज्य सरकारने उपलब्ध करून दिली आहे. सातारा जिल्ह्यात ११ तालुक्यांत एकूण एक हजार ७१५ गावे असून, दहा लाख ५९ हजार २०१ शेतकऱ्यांची नोंद आहे. परंतु, केवळ तीन लाख ५१ हजार ७२१ शेतकऱ्यांनी पीक पाहणी केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, शासनाच्या या सुविधेला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद असून, जिल्ह्यात एकूण ३५ टक्के शेतकऱ्यांनीच पीक पाहणी केल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

गावपातळीवर जमिनीचे महसुली लेखे ठेवण्याकरिता विविध गाव नमुने व दुय्यम नोंदवह्या विहित करण्यात आल्या आहेत. यामधील गाव नमुना सात हा अधिकार अभिलेख विषयक असून, गाव नमुना बारा हा पिकांची नोंदवही ठेवण्यासंदर्भात आहे. ही माहिती अद्ययावत करण्यासाठी शासनाने पीक पाहणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. दरम्यान, शेतकरी प्रत्यक्ष शेतावर जाऊन ई-पीक पाहणी या मोबाईल ॲपद्वारे फोटो अपलोड करत आहेत. या ॲपमध्ये अक्षांश व रेखांशाची नोंद होत असल्याने शेतीचे क्षेत्रही तत्काळ लक्षात येत आहे. तलाठ्याकडून या फोटो व स्थानाची पडताळणी होणार असून, त्यानंतर शेतातील पिकांची नोंद संबंधित शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर होणार आहे.

हेही वाचा: अकोला : रोहयो विधिमंडळ समितीची जिल्ह्यातील कामांवर नाराजी!

दरम्यान, जिल्ह्यातील पीक पाहणीत सर्वाधिक शेतकऱ्यांची नोंद पाटण तालुक्यात एक लाख ५७ हजार ५५१ आहेत. तसेच, जिल्ह्यात सर्वाधिक कऱ्हाड तालुक्यात ७८ हजार १३९ शेतकऱ्यांनी पीक पाहणी केली असून, सर्वांत कमी पीक पाहणी सहा हजार ४३४ शेतकऱ्यांनी केली आहे.

हेही वाचा: डोंबिवली : सहा वर्षांपासून मोक्कातील फरार सलमान अखेर जेरबंद

३०० हून अधिक पिकांची नोंद

अनेक वर्षांपासून सातबारा उताऱ्यावर पिकांच्या नोंदी अद्ययावत होत नाहीत. या पार्श्‍वभूमीवर भूमिअभिलेख विभागाने हे ॲप विकसित केले आहे. या ॲपद्वारे शेतकरी पिकांचे फोटो अपलोड करत असल्याने नव्याने सुमारे ३०० हून अधिक पिकांची नोंद सातबाऱ्यावर होऊ लागली आहे. ॲपवर पिकांची वर्गवारीही केली असून, कुठल्या पिकाखाली किती क्षेत्र व्यापत आहे, याची माहिती मिळणार आहे.

loading image
go to top