
Transformer thefts in Koregaon damage crops; six incidents reported in 15 days along Satara Road.
Sakal
कोरेगाव : तालुक्यातील सातारारोड मंडल परिसरातील महावितरण कंपनीचे सुमारे १०० वर अश्वशक्ती क्षमतेचे सहा ट्रान्स्फॉर्मर चोरीला गेले असून, त्यामुळे पाणी असून, पिकांना पुरवठा करता येत नाही. या पार्श्वभूमीवर ट्रान्स्फॉर्मर चोरांचा तातडीने छडा लावण्याची मागणी दि महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनच्या सातारा शाखेने जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.