Satara Crime: 'दहिवडी परिसरातील सराईत चोरट्यांना बेड्या'; पोलिसांकडून नऊ गुन्हे उघडकीस; एका अल्पवयीनासह दहाजण ताब्यात
Crackdown on Dahivadi Theft Gang: अज्ञात आरोपींचा दहिवडी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे हे स्वतः सहकाऱ्यांसह शोध घेत होते. हा तपास सुरू असतानाच त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत संशयितांची माहिती मिळाली.
Serial Burglar Gang Busted in Dahivadi; 9 Cases LinkedSakal
दहिवडी : दहिवडी पोलिसांनी सराईत चोरट्यांची टोळी जेरबंद केली असून, त्यांच्याकडून चोरीचे नऊ गुन्हे उघडकीस आणले आहेत. या गुन्ह्यांमधील तब्बल १३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.