

Umbraj Traffic Woes Trigger Arguments Among Motorists
Sakal
उंब्रज : येथील सेवा रस्त्यावरील वाहतूक कोंडीने वाहनधारकांसह स्थानिक हैराण झाले आहेत. वाहतूक कोंडीची रोजचीच कटकट झाली असून, त्यामुळे सेवा रस्त्यावरून नागरिकांना कसरत करत प्रवास करावा लागत आहे. वाहनधारकांना वादावादीचे प्रकारांना सामना करावा लागत आहे. येथे पार्किंग सुविधेचा अभाव असल्याने ही वाहतूक कोंडी संपणार कधी? असा सवाल वाहनधारकांतून उपस्थित हाेत आहे. वाहतूक कोंडीतून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून, याकडे संबंधित विभाग लक्ष कधी देणार? असा संतप्त सवाल वाहनधारकांतून हाेत आहे.