कलेढोणला वरुणराजाची जोरदार हजेरी, द्राक्षबागांचे मोठे नुकसान

कलेढोणला वरुणराजाची जोरदार हजेरी, द्राक्षबागांचे मोठे नुकसान

कलेढोण (जि. सातारा) : परतीच्या पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने पूर्व हंगामी द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कोट्यवधी रुपयांच्या द्राक्ष आणि कांदा पिकाची हानी झाल्याने उत्पादक हैरण झाले. शहरासह ग्रामीण भागात अचानक अंधारून येत मुसळधार पावसाने जोर धरला. कलेढोण, विखळे, तरसवाडी, गारुडी, पाचवड व गारळेवाडी आदी परिसराला पावसाचा मोठा तडाखा बसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. 

या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. वादळी वाऱ्यामुळे द्राक्षबागांत पाने फाटल्याने द्राक्षपिकांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे द्राक्षवेलीत आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने द्राक्षघड जिरण्याचे प्रमाण वाढल्याने फळधारणेवर परिणाम होणार असल्याचे शेतकरी डॉ. दीपक यलमर यांनी सांगितले. वादळी वाऱ्यामुळे मुळीकवाडीत ऊस शेतात कोलमडून पडला आहे. शेतात उभी असलेली मका व बाजरी पिकांचेही नुकसान झाले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com