

Damyantiraje Bhosale
Sakal
सातारा : पालिकेच्या निवडणुकीत यावेळेस सर्वाधिक महिला उमेदवार आपल्याकडे असून, नारीशक्तीला कमी समजू नका. त्याही सभागृह चालवू शकतात. त्यामुळे महिला उमेदवारांच्या प्रचारात पुरुष उमेदवारांनी वेळ द्यावा, अशी सूचना दमयंतीराजे भोसले यांनी केली. प्रभागातील दोन्ही उमेदवारांनी एकत्रित प्रचारावर भर द्यावा, तसेच महिला उमेदवारांनीही त्यांच्या प्रचारासाठी आमची आवश्यकता असेल तेथे बोलवावे, असे त्यांनी सांगितले.