Burglary in Vahagaon: Gold ornaments and cash stolen in broad daylight, fear grips Wai Taluka.
सातारा
भरदिवसा घरफोडी! 'वहागावात साडेचार तोळे दागिन्यांसह ३५ हजारांची रोकड लंपास'; वाई तालुक्यात भीतीचे वातावरण
Daylight Burglary in Vahagaon: नंदकुमार निंबाळकर यांची आल्याची शेती आहे. सोमवारी त्यांच्या शेतामध्ये खुरपणीसाठी मजूर असल्याने ते सकाळी दहाच्या सुमारास घराला कुलूप लावून शेतात गेले होते,तसेच त्यांच्या पत्नी कामानिमित्त सातारा येथे गेल्या होत्या. नंदकुमार निंबाळकर हे दुपारी जेवण करण्यासाठी शेतातून घरी आले.
भुईंज : येथून नजीकच्या वहागावमध्ये (ता. वाई) आज भरदिवसा घरफोडीची घटना घडली. यामध्ये सुमारे साडेचार तोळ्याचे, सव्वादोन लाख रुपये किमतीचे दागिने, तसेच ३५ हजारांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे वहागावसह परिसरात भीतीचे वातावरण आहे.

