राष्ट्रवादीच्याच संचालकाला अध्यक्षपदावर संधी; शरद पवार, अजित पवार घेणार अंतिम निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar

निवडणुकीत शरद पवारांनी सुचवलेला अध्यक्षपदाचा उमेदवार पराभूत झाला आहे.

राष्ट्रवादीच्याच संचालकाला अध्यक्षपदावर संधी

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (Satara District Bank Election) राष्ट्रवादीच्या सहकार पॅनेलची (NCP Co-operation Panel) निर्विवाद सत्ता आल्यानंतर आता बॅंकेची धुरा कोणाच्या हातात दिली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अध्यक्षपदाच्या रेसमध्ये सध्या राजेंद्र राजपुरे, नितीन पाटील, दत्तानाना ढमाळ यांची नावे पुढे आहेत. उपाध्यक्षपदासाठी ऐनवेळी नाव सुचविले जाण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसांत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर (Ramraje Naik-Nimbalkar) हे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील व इतर आमदारांसोबत बैठक घेऊन अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठीची नावे ठरवणार आहेत. या नावांवर खासदार शरद पवार (MP Sharad Pawar) व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे शिक्कामोर्तब करतील.

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीपूर्वी खासदार शरद पवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी आमदार शशिकांत शिंदे हेच आगामी काळात जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष असतील, असे सूतोवाच केले होते. त्यामुळे त्यांचे नाव निश्चित झाले होते. मध्यंतरीच्या काळात झालेल्या अनेक घडामोडींत जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत त्यांच्याच जवळच्या लोकांनी त्यांचा परफेक्ट गेम केला. त्यामुळे शरद पवारांनी सुचवलेला अध्यक्षपदाचा उमेदवार पडल्याने आता निवडून आलेले व तीन टर्म जिल्हा बॅंकेत संचालक झालेल्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

हेही वाचा: DCC Bank Election : साताऱ्यात लवकरच राजकीय भूकंप?

अध्यक्षपदासाठी अनेक इच्छुक

महाबळेश्वरचे राजेंद्र राजपुरे, वाईचे नितीन पाटील, खंडाळ्याचे दत्तानाना ढमाळ हे जिल्हा बॅंकेत अध्यक्ष होण्यासाठी इच्छुक आहेत. नितीन पाटील वगळता हे इच्छुक यापूर्वी एक वर्ष उपाध्यक्ष झालेले आहेत. इच्छुक कोणीही असले तरी अनुभवावर राष्ट्रवादीतीलच संचालकाला अध्यक्षपदाची धुरा दिली जाणार आहे. पण, त्यासाठी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व सहकारमंत्री बाळासाहेब पाटील हे आमदारांसोबत एकत्र बसून चर्चा करून नावे अंतिम करतील. पण, या नावांवर अंतिम शिक्कामोर्तब खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार हेच करणार आहेत.

हेही वाचा: NCP कार्यालयावर दगडफेक दुर्दैवी : शरद पवार

NCP Co-operation Panel

NCP Co-operation Panel

इच्छुकांची आत्तापासूनच फिल्डिंग

बॅंकेच्या निवडणुकीत मदत केल्यामुळे आमदार शिवेंद्रसिंहराजेंना पुन्हा अध्यक्ष करावे, अशी मागणी काही संचालकांकडून होत आहे. पण, यावेळेस राष्ट्रवादीचे नेते सावध पवित्रा घेऊन राष्ट्रवादीच्याच संचालकाला पदाधिकारी करण्याची शक्यता आहे. त्यामध्ये वाईचे नितीन पाटील हे तीन टर्म बॅंकेचे संचालक असून त्यांना अद्यापपर्यंत उपाध्यक्ष किंवा अध्यक्षपद दिलेले नाही. त्यामुळे त्यांना अध्यक्षपदाची संधी दिली जाण्याची शक्यता आहे. राजेंद्र राजपुरेंचाही अध्यक्षपदासाठी विचार केला जाऊ शकतो. ते स्वत: इच्छुक असून या दोन्ही इच्छुकांनी आतापासूनच फिल्डिंग लावण्यास सुरवात केली आहे.

हेही वाचा: 'चंद्रकांत पाटलांनी भाकीत व्यक्त करण्याचा व्यवसाय सुरू केलाय'

जिल्हा बॅंकेत दोन गट पडणार?

जिल्हा बॅंकेत राष्ट्रवादीची सत्ता असली तरी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांना मानणारे सात संचालक आहेत. आमदार शशिकांत शिंदे हे बॅंकेत नसल्याने आमदार मकरंद पाटील यांचे बॅंकेतील कामकाजावर लक्ष राहणार आहे. त्यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या शर्यतीत बॅंकेत दोन गट पडण्याची शक्यता आहे. एकीकडे शिवेंद्रसिंहराजेंना मानणारे व दुसरीकडे मकरंद पाटील यांना मानणारे राष्ट्रवादीचे संचालक अशी स्थिती होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: मरेपर्यंत पवारसाहेबांची साथ सोडणार नाही; पण..

loading image
go to top