'शेवटच्या क्षणापर्यंत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मला समजावण्याचा प्रयत्न केला; पण मी..' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dnyandev Ranjane

मला शेवटच्या क्षणापर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला; पण..

'शेवटच्या क्षणापर्यंत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला; पण..'

sakal_logo
By
हेमंत पवार

सातारा : मला शेवटच्या क्षणापर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, मतदार संघातील जनतेनं मोठा उठाव केला. नाईलाजानं माझी लढाईची इच्छा नसतानाही मला मतदारांच्या आग्रहाखातर निवडणूक लढवावी लागली. त्यात माझा झालेला विजय हा जावळीतील जनतेचा विजय आहे, अशी विजयानंतर ज्ञानदेव रांजणे (Dnyandev Ranjane) यांनी प्रतिक्रिया दिली.

सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत रांजणे हे आज विजयी झाले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. रांजणे म्हणाले, सर्वसमान्य जनतेचा आवाज माझ्या विजयाच्या रुपानं जिल्हा बॅंकेत पोहचला आहे. हा विजय जावली तालुक्यातील सर्व जनतेचा आहे. सर्वांनी मला साथ दिली. त्यामुळं माझा विजय सुकर झाला.

हेही वाचा: आमदार शिंदेंचा 'करेक्ट' कार्यक्रम करून शिवेंद्रराजेंनी धरला गाण्यावर ठेका

शशिकांत शिंदेंच्या उमेदवारीमुळं तुमच्यावर नेत्यांनी प्रेशर आणले का? या प्रश्‍नावर रांजणे म्हणाले, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, सहकारमंत्री बाळसाहेब पाटील, आमचे नेते आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील यांनी मला शेवटच्या क्षणापर्यंत समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, मतदार संघातील जनतेनं मोठा उठाव केला. नाईलाजानं माझी लढाईची इच्छा नसतानाही मला मतदारांच्या आग्रहाखातर निवडणूक लढवावी लागली. हा जावळीतील जनतेचा विजय आहे, असं त्यांनी सांगितलं.

हेही वाचा: रामराजे सातारा जिल्ह्याला लागलेला 'कॅन्सर' : शेखर गोरे

loading image
go to top