राष्ट्रवादीकडून शिवसेनेला एकाकी पाडण्याचा प्रयत्न; पराभवानंतर गृहराज्यमंत्री संतापले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shambhuraj Desai

'कोणाच्या मदतीनं कोणाचा विजय होतो, तर कोणाचा पराभव होतो. प्रत्येकवेळी राजकारण वेगळं असतं.'

राष्ट्रवादीकडून शिवसेनेला एकाकी पाडण्याचा प्रयत्न : शंभूराज देसाई

sakal_logo
By
हेमंत पवार

सातारा : जिल्हा बॅंकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress Party) राज्यस्तरीय नेत्यांकडून मला आपण एकत्रित निवडणूक लढवायची आहे, असे निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सांगितले जात होते. मात्र, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकाही राज्यस्तरीय नेत्याचा, जिल्ह्यातील नेत्यांचा कोणाचाच संपर्क झाला नाही. शिवसेनेला (ShivSena) एकाकी पाडायचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसकडून होत असेल, तर आम्ही पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना सांगून लोकशाही मार्गानं शिवसेनेच्या वतीनं आम्ही यापुढे स्वतंत्र निवडणुका लढवू. कोणाच्या मदतीनं कोणाचा विजय होतो, तर कोणाचा पराभव होतो. प्रत्येकवेळी राजकारण वेगळं असतं. मी माझा झालेला पराभव खिलाडूवृत्तीनं स्वीकारत आहे, अशी प्रतिक्रिया पाटण सोसायटी गटातून पराभूत झालेले गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी दिली.

हेही वाचा: विधानसभेनंतर शशिकांत शिंदेंचा दुसऱ्यांदा पराभव

मंत्री देसाई म्हणाले, माझ्या प्रतिस्पर्ध्यांनी गेले दोन महिने सणासुदीच्या काळात सुध्दा मतदार बाहेर ठेवले. याला परिवर्तन म्हणतात का? निवडणुकीत कोणचा विजय, कोणाचा पराजय होतंच असतो. मी माझा पराभव स्वीकारला आहे. परंतु, 102 मतांच्या निवडणुकीला परिवर्तन असं म्हणता येत नाही. परिवर्तन हे मी मागील 4 महिन्यापूर्वी दाखवल आहे. माझ्या प्रतिस्पर्ध्यांनी गेले दोन महिने सणासुदीच्या काळात सुध्दा मतदार बाहेर ठेवले. याला परिवर्तन म्हणतात का? राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून शिवसेनेला एकाकी पाडायचा प्रयत्न होत असेल, तर आम्ही पक्षाचे प्रमुख ठाकरे यांना सांगून लोकशाही मार्गानं शिवसेनेच्या वतीनं यापुढं स्वतंत्र निवडणुका लढवू, असा इशारा दिला आहे.

हेही वाचा: रांजणेंचा 'विजय' दहशत, गुंडगिरीवर मिळवलेला विजय आहे : शिवेंद्रराजे

loading image
go to top