विधानसभेनंतर शशिकांत शिंदेंचा दुसऱ्यांदा पराभव; शरद पवार राष्ट्रवादीच्या नेत्यांना जाब विचारणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad pawar

शरद पवार यांनी आमदार शशिकांत शिंदे यांच्याशी कमराबंद चर्चा सुरू केलीय.

विधानसभेनंतर शशिकांत शिंदेंचा दुसऱ्यांदा पराभव

सातारा : जिल्हा बँक संचालकपदाच्या निवडणुकीत जावळी तालुका सोसायटी मतदारसंघात संघातून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (MLA Shivendrasinharaje Bhosale) यांचे कट्टर समर्थक ज्ञानदेव रांजणे यांचा एक मताने विजय झाला असून, आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांना पराभवाचा धक्का बसला आहे. या निकालानं जिल्ह्यात राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालीय. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) सध्या सातारा जिल्हा दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यातील महाबळेश्वरात राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसमधील युवकांसाठी मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आलाय. याच पार्श्वभूमीवर पवार हे जिल्हा दौऱ्यावर असल्याचे समजते.

हेही वाचा: रांजणेंचा 'विजय' दहशत, गुंडगिरीवर मिळवलेला विजय आहे : शिवेंद्रराजे

दरम्यान, आज सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव झाल्याने राष्ट्रवादीतील शिंदे समर्थकांमध्ये कमालीची नाराजी पसरलीय. त्यातूनच सकाळी काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे कार्यालय फोडले आहे. आज सायंकाळी ज्येष्ठ नेते शरद पवार हे सातारा शहरातील शासकीय विश्रामगृहात दाखल झाले. तिथे त्यांनी खासदार श्रीनिवास पाटील यांना आपल्यासमवेत घेतले.

हेही वाचा: शिंदेंच्या पराभवानंतर शिवेंद्रराजे, महेश शिंदेंचा तुफान डान्स

त्यानंतर आमदार शशिकांत शिंदे यांच्याशी कमराबंद चर्चा सुरू केलीय. हळूहळू एकेक राष्ट्रवादीचे नेते शासकीय विश्रामगृहात येऊ लागले आहेत. यावेळी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील हे देखील शासकीय विश्रामगृहात पोहोचले आहेत. काही वेळानंतर राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्यांची पवार बैठक घेणार असल्याचे समजते. या बैठकीत शरद पवार नेत्यांची खरडपट्टी करणार का? हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आमदारकीनंतर शशिकांत शिंदेंचा हा दुसरा पराभव आहे, त्यामुळं पवार राष्ट्रवादीच्या नेत्यांवर निशाणा साधण्याची शक्यता आहे. बॅंक निवडणुकीत 49 मतदानापैकी आमदार शिंदे यांना 24 मते मिळाली, तर विजयी उमेदवार रांजणे यांना 25 मते मिळाली आहेत.

हेही वाचा: 'आमदार शशिकांत शिंदेंच्या पराभवाचं दु:ख; राजकीय समिकरणं बदलणार'

loading image
go to top