'आमदार जयकुमार गोरे तटस्थ राहतील, अशी अपेक्षा होती; पण त्यांनी..' I Shekhar Gore | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shekhar Gore

निवडणुकीत भाजप आमदार जयकुमार गोरे तटस्थ राहतील, अशी अपेक्षा होती; पण..

'आमदार जयकुमार गोरे तटस्थ राहतील, अशी अपेक्षा होती; पण त्यांनी..'

sakal_logo
By
विशाल गुंजवटे

बिजवडी (सातारा) : बोराटवाडी (ता. माण) येथे आमचे गोरे कुटुंबीय एकोप्याने राहत असताना राजकारणामुळे आमच्यात तू-तू मै-मै होत गेली. गेली ८ वर्षे मी वडील भगवानराव गोरे (दादा) व कुटुंबीयांपासून दूर होतो. मात्र, ८ वर्षानंतर या जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं वडिलांचे आशीर्वाद घ्यावेत, यासाठी घरी गेलो होतो. त्यांचे आशीर्वाद घेतल्यानंतर, तिथेच आमचे थोरले बंधू आमदार जयकुमार गोरेही (MLA Jaykumar Gore) उपस्थित होते. त्यावेळी त्यांचेही निवडणुकीसाठी आशीर्वाद घेतले. पण, त्यांनी या बँकेच्या निवडणुकीत तटस्थ न राहता राष्ट्रवादीशी (NCP) जवळीक साधत आपल्याला विरोध करत जाणीवपूर्वक मदत टाळली असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते व जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे (ShivSena leader Shekhar Gore) यांनी केले.

हेही वाचा: NCP ला मोठा धक्का! शरद पवारांच्या निष्ठावंत आमदाराचा एका मतानं पराभव

कुळकजाई (ता. माण) येथे निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर शेखर गोरे पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते. ते म्हणाले, मतदानाच्या आदल्यादिवशी आपण ठराविक कार्यकर्त्यांसमवेत वडिलांचे आशीर्वाद घेण्यासाठी बोराटवाडीत घरी गेलो. यावेळी वडील भगवानराव गोरे (Bhagwanrao Gore) दादांनी आपल्याला विजयी हो...असे आशीर्वाद दिले. त्यानंतर आमदार गोरेंचे आशीर्वाद घेतले. त्यांचे आशीर्वाद घेतल्यानंतर आपल्याला त्यांनी मदत नाही केली, तरी निदान तटस्थ तरी राहतील अशी अपेक्षा होती. तरीही त्यांनी तटस्थ न राहता आपल्याला विरोधच केला. त्यांनी मदत न केल्याचे दु:ख वाटत नाही.

हेही वाचा: 'माझा पराभव झाला, म्हणून कट कारस्थान करणाऱ्यांनी धिंगाणा घातला'

वडिलांचे आशीर्वाद माझ्यासाठी पुरेशे होते. त्यांच्या आशीर्वादाबरोबरच नियतीच्याही मनात आपल्याला विजयी करायचे होते. त्यामुळे आपला चिठ्ठीवर विजय झाला आहे. वडील भगवानराव गोरे दादांनी आशीर्वादाबरोबरच खंबीर साथ देत आपल्या विजयी रॅलीतही येत त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिले. त्यावेळी मी भावूक होवून त्यांच्या गळ्यात पडलो. त्यावेळी भगिनी सुरेखा पखालेही उपस्थित होत्या.

हेही वाचा: राष्ट्रवादीच्याच संचालकाला अध्यक्षपदावर संधी

loading image
go to top