माजी आमदाराच्या बंगल्यात सापडला अर्धवट पुरलेला मृतदेह; साताऱ्यात उडाली खळबळ I Crime News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Taluka Police)

बंगल्याच्या परिसराची साफसफाई करत असताना हा प्रकार समोर आला.

Crime News : माजी आमदाराच्या बंगल्यात सापडला अर्धवट पुरलेला मृतदेह; साताऱ्यात उडाली खळबळ

सातारा : साताऱ्यातून एक धक्कादायक बातमी समोर आलीये. वाढे इथं मातीत अर्धवट पुरलेला मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळं एकच खळबळ उडालीये.

भाजपाच्या माजी आमदार कांताताई नलावडे (Kantatai Nalawade) यांच्या बंद असलेल्या बंगल्याच्या परिसरात हा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे. सातारा तालुका पोलीस (Satara Taluka Police) रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी होते. मृतदेहाबद्दल माहिती घेण्याचं काम सुरू होतं.

हेही वाचा: Crime Branch : बदला घेऊन महिलेसह 4 मुलांची हत्या; 28 वर्षांनंतर पहिल्या आरोपीला अटक

सातारा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, वाढे गावात माजी आमदार कांताताई नलावडे यांचं निवासस्थान आहे. या निवासस्थानाच्या परिसरात काल (शुक्रवार) दुपारच्या सुमारास अर्धवट पुरलेल्या स्थितीत मृतदेह दिसून आला. त्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. बंगल्याच्या परिसराची साफसफाई करत असताना हा प्रकार समोर आला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता, त्यामुळं तो महिलेचा की पुरुषाचा हे अद्याप समजू शकलेलं नाहीये. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा: Narendra Modi : PM मोदींच्या वडिलांचं निधन झालं, तेव्हाही ते..; VHP नेत्यानं करुन दिली 'ती' आठवण