मशीनमध्ये अडकून महिला कामगाराचा मृत्यू; वाईच्या औद्योगिक वसाहतीतील दुर्घटना

नेट प्रोसेस विभागात काम करीत आहेत.
Death  laborer by machine
Death laborer by machine sakal

वाई : येथील औद्योगिक वसाहतीतील एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या महिला कामगारांचा यंत्रणेत अडकल्याने मृत्यू झाला. सकाळी साडे सातच्या सुमारास ही दुर्घटना घडली. छाया संतोष बोधे (वय ३८ वर्षे) असे मृत कामगारांचे नाव आहे.

Death  laborer by machine
महिला जोपासताहेत औषधी वनस्पती

त्या मागील सहा वर्षांपासून गरवारे टेक्निकल फायबर्स या कंपनीत नेट प्रोसेस विभागात काम करीत आहेत. आज फर्स्ट शिपसाठी सकाळी सात वाजता त्या कामावर गेल्या. यावेळी रोप-वेचे काम करीत असताना त्याचा पाय अडकल्याने त्यांचे संपूर्ण शरीर वेगाने दोरीसोबत गुंडाळले गेले. यावेळी कामावर असलेल्या अन्य कामगारांनी त्वरित मशीन बंद केले. दरम्यान त्या बेशुद्ध पडल्या होत्या.त्यांना तातडीने वाईतील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. तिचे पती संतोष तान्याबा बोधे हे देखील कंपनीत हाऊस किपिंगचे विभागात काम करीत आहेत. त्यांना दोन मुली व एक मुलगा आहे. या घटनेची नोंद वाई पोलिसात झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com