आंबळेतील दोन तरुणांच्या मृत्यूने गावावर शोककळा

होतकरू तरुणांचा दुर्दैवी अंत
Accident
Accidentsakal

तारळे (सातारा) : पुणे-बंगळूर महामार्गावरील शेंद्रेनजीक अज्ञात वाहनाने दुचाकीला ठोकरल्याने दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या अन्य एका तरुणाचा रुग्णालयात उपचार सुरू असताना आज सकाळी मृत्यू झाला. सचिन बाळू दीक्षित (वय ३९) आणि वसंत विलास घाडगे (वय २८, रा. आंबळे, ता. पाटण) अशी त्यांची नावे आहेत. दोन तरुणांचा मृत्यू झाल्याने आंबळे गावावर शोककळा पसरली आहे.

Accident
केंद्राच्या मदतीनं परमबीर सिंह यांना शोधत आहोत: वळसे पाटील

साताऱ्यावरून सचिन दीक्षित आणि वसंत घाडगे हे दोघे दुचाकीवरून आंबळे गावी येत असताना मंगळवारी (ता. २८) रात्री नऊच्या सुमारास त्या दोघांना अज्ञात वाहनाने ठोकरले. त्यात गंभीर दुखापत झाल्याने सचिन दीक्षित हे जागीच ठार झाले. तर वसंत घाडगे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. घाडगे यांच्यावर उपचार सुरू असताना आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला. त्या दोघांवर काळाने घाला घातल्याने क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. सचिन यांना दोन शाळकरी मुले आहेत.

वसंत यांना केवळ पाच महिन्यांची मुलगी आहे. वडील म्हणजे काय, हे कळायच्या आत ही चिमुकली पोरकी झाली. हातावर पोट असणाऱ्या कुटुंबातील हे दोन्ही तरुण आहेत. सचिन हे आईच्या वडापावच्या गाडीला हातभार लावत होते. सचिन यांच्या जाण्याने दीक्षित कुटुंबाचा कर्ता आधार गमावला आहे. त्यांच्या मागे सहावी व आठवीत शिकणारी दोन मुले, पत्नी व आई आहे. वसंत सातारा येथील कूपर कंपनीत कामाला होते. त्यांना चार महिन्यांची चिमुरडी, पत्नी, आई, भाऊ असा परिवार आहे. दोन्ही युवकांचा ऐन तारुण्यातच मृत्यू झाल्याने गावाने हळहळ व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com