

Bike riders performing breathtaking aerial stunts in the chilly weather of Panchgani.
sakal
भोसे : निसर्गरम्य पाचगणीच्या डोंगरदऱ्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या ‘इंडिया बाईक वीक’ (आयबीडब्ल्यू) या देशातील सर्वात मोठ्या बाईकिंग महोत्सवाची आज मोठ्या उत्साहात आणि चित्तथरारक कसरतींनी सांगता झाली. कडाक्याच्या थंडीतही बाईक रायडर्सनी कृत्रिम उंचवट्यांवरून घेतलेल्या उत्तुंग झेपा आणि हवेत केलेली स्टंटबाजी पाहून पाचगणीकर आणि पर्यटक भारावून गेले होते.