esakal | 'गणेशोत्सव मंडळांनी अतिवृष्टीग्रस्तांना हात द्यावा'
sakal

बोलून बातमी शोधा

'गणेशोत्सव मंडळांनी अतिवृष्टीग्रस्तांना हात द्यावा'

पोलिस उपअधीक्षक शीतल जानवे- खराडे म्हणाल्या, ‘‘कोरोनाने संपूर्ण जगाला ग्रासले आहे. याचा विचार करून सार्वजनिक उत्सव नियमात करा, गणेश आगमन व विसर्जनाला मिरवणुकीस परवानगी नाही.

'गणेशोत्सव मंडळांनी अतिवृष्टीग्रस्तांना हात द्यावा'

sakal_logo
By
रविकांत बेलोशे

भिलार (सातारा): अतिवृष्टीने जिल्ह्यात मोठे नुकसान झाले. अनेक लोक बेघर झाले असून, अनेकांनी प्राण गमावले. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करून या लोकांचे संसार उभे करण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन पोलिस उपअधीक्षक शीतल जानवे- खराडे यांनी केले.

हेही वाचा: नगरसेवकांच्या वादाचे अधिकाऱ्यांकडून 'राजकारण'; कऱ्हाडात रखडल्या सभा

पाचगणी पोलिस ठाणे हद्दीतील गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकारी व पोलिस पाटील यांच्या संयुक्त बैठकीत मार्गदर्शन करताना जानवे बोलत होत्या. या वेळी प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार सुषमा चौधरी - पाटील, महाबळेश्वरच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील, पाचगणीचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, सहायक पोलिस निरीक्षक सतीश पवार, महावितरणचे उपअभियंता सचिन बाचल, जिल्हा पोलिस पाटील संघटनेचे उपाध्यक्ष बाजीराव पार्टे, महाबळेश्वर तालुकाध्यक्ष अजित राजपुरे, मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पोलिस पाटील आदी उपस्थित होते.

हेही वाचा: जिल्हा बॅंकेच्या 1963 मतदारांची कच्ची यादी आज प्रसिध्द होणार

जानवे- खराडे म्हणाल्या, ‘‘कोरोनाने संपूर्ण जगाला ग्रासले आहे. याचा विचार करून सार्वजनिक उत्सव नियमात करा, गणेश आगमन व विसर्जनाला मिरवणुकीस परवानगी नाही. आपल्या घरातून अथवा आपल्या मंडळातून कोरोनाचा फैलाव होणार नाही, यासाठी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा.’’ प्रांताधिकारी जाधव म्हणाले, ‘‘सध्या गणेशोत्सवाला कोरोनाची किनार आहे. केरळमध्ये ओनम सणानंतर लाट आली आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता असून, यासाठी सर्वांनी प्रशासनाचे नियम पाळून गणेशोत्सव साजरा करावा.’’ या वेळी गिरीश दापकेकर, पल्लवी पाटील, सचिन बाचल यांनीही मार्गदर्शन केले. प्रमोद पवार यांनी सूत्रसंचालन केले. सहायक पोलिस निरीक्षक सतीश पवार यांनी आभार मानले.

loading image
go to top