esakal | नगरसेवकांच्या वादाचे अधिकाऱ्यांकडून 'राजकारण'; कऱ्हाडात रखडल्या सभा
sakal

बोलून बातमी शोधा

नगरसेवकांच्या वादाचे अधिकाऱ्यांकडून 'राजकारण'; कऱ्हाडात रखडल्या सभा

विभागप्रमुखांच्या टिप्प्पणीच नसल्याने सर्वसाधारण सभा, स्थायीची सभा वर्षभरापासून रखडल्या आहेत.

नगरसेवकांच्या वादाचे अधिकाऱ्यांकडून 'राजकारण'; कऱ्हाडात रखडल्या सभा

sakal_logo
By
सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड (सातारा): पालिकेतील राजकीय वादाचा व आघाड्यांच्या अस्थिरतेचा गैरफायदा घेत विभागप्रमुख राजकारण करत आहेत. मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी मासिक बैठकांच्या विषयांच्या टिप्पणी देण्याचे दोन वेळा विभागप्रमुखांना आदेश दिले. मात्र, त्या आदेशाला थेट केराची टोपली दाखवली गेली. विभागप्रमुखांच्या टिप्प्पणीच नसल्याने सर्वसाधारण सभा, स्थायीची सभा वर्षभरापासून रखडल्या आहेत. मात्र, विभागप्रमुख हा आरोप आपल्यावर येऊ न देता नगरसवेकांवर ढकलण्याचे कसब बाळगत आहेत. सत्ताधारी व विरोधकांत वाद पेटता राहिला पाहिजे, याची काळजी घेणाऱ्या व सभांच्या टिप्पणी न देणारे विभागप्रमुख आता थेट कारवाईच्या रडारवर आहेत, असे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा: कऱ्हाड : उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरा- प्रहार संघटना

पालिकेत ११ विभाग आहेत. पालिकेत दोलायमान, अस्‍थिर स्थिती असल्याने अधिकारी त्याचा गैरफायदा घेत आहेत. काही विभागांत मनुष्यबळ कमी असूनही काम चांगले तर काही विभागांत मनुष्यबळ पुरेसे असूनही विस्कळित कारभार आहे. पालिकेत राजकीय स्थिती अस्‍थिर असल्याने नगरसवेकांतील वाद अधिकारी हस्ते-परहस्ते वाढवतानाही दिसताहेत. पालिकेत नगराध्यक्षांसह भाजप, जनशक्ती, लोकशाही आघाडीत वाद आहेत. त्याचे ज्ञान विभागप्रमुखांना आहे, त्यामुळे त्यांच्यातील राजकीय वादांसह आरोपांची दरी वाढवण्यावर त्यांचा भर आहे. सत्ताधारी गटाच्या कोणत्या गोष्टी लपवायच्या, विरोधकांच्या कोणत्या गोष्टी उघड करायच्या, याचीही काळजी विभागप्रमुख घेत आहेत.

हेही वाचा: कऱ्हाड: सरपंच परिषदेची कार्यकारिणी जाहीर

नगरसेवक मात्र त्यांच्याच सांगण्यावरून एकमेकांच्या विरोधात आरोप करत आहेत. चुका दाखवतही आहे. मात्र, त्या चुका करणारे विभागप्रमुख सत्ताधारी नगरसवेकांमागे लपत आहेत. सभा केवळ विभागप्रमुखांच्या कामचुकारपणामुळे लांबल्या आहेत. मुख्याधिकारी डाके यांनी प्रत्येक विभागप्रमुखाला दिलेल्या नोटीसीवरून ते स्पष्ट होत आहे. मात्र, नगरसेवकांत भांडणे लावण्याऱ्या अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणा त्याच वादामागे लपतो आहे. नगरसवेकांना हाताशी धरले की, मुख्याधिकारी काहीच बोलत नाहीत, अशी विभागप्रमुखांची मानसिकता मोडण्याची गरज आहे.

हेही वाचा: कऱ्हाड, साताऱ्यात सेना आक्रमक;पाहा व्हिडिओ

पालिकेत मासिक बैठकांवरून लोकशाही व जनशक्ती आघाडी आक्रमक आहे. थेट नगराध्यक्षांवर आरोप होत आहेत. नगराध्यक्षाही खुलासा करताना सात ते आठ पत्र लिहून विषयांच्या टिप्पणी मागविल्याचे सांगत आहेत. मुख्याधिकारी डाके यांनीही विभागप्रमुखांना दहा वेळा लेखी पत्र लिहून मासिक बैठकीतील विषयांची यादी व त्याची टिप्‍पणीही देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, त्याला विभागप्रमुखांनी केराची टोपली दाखवली आहे. त्यांच्या एकाही पत्राचे उत्तर विभागप्रमुखांनी दिलेले नाही. त्यामुळे मुख्याधिकारी आता थेट त्यांच्यावर करवाई करण्याच्या मानसिकतेत आहेत.

हेही वाचा: 'नारायण राणे मुर्दाबाद..'; कऱ्हाड, साताऱ्यात सेना आक्रमक

विभागप्रमुखांना विषयांच्या टिप्पणी देण्याबाबत वारंवार लेखी पत्र दिले आहे. ते टिप्पणी देत नाहीत. त्यामुळे सभा रखडल्या आहेत. टिप्पणी न देणाऱ्यांवर आता थेट कारवाई करण्यात येणार आहे.

- रमाकांत डाके, मुख्याधिकारी, कऱ्हाड

loading image
go to top