
कऱ्हाड: मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील हे २९ ऑगस्टपासून मुंबईत आंदोलन करणार आहेत. त्यासाठी तालुक्यातून हजारो कार्यकर्ते त्यांना पाठिंबा देण्यासाठी जाणार आहेत. त्याच्या तयारीची मराठा बांधवांची आढावा बैठक आज येथे झाली. यात मोठ्या संख्येने त्यांच्या पाठिंब्यासाठी जाण्याचा निर्धार बांधवांच्या वतीने करण्यात आला.