
शेणोली : परिस्थिती आणि संकट एकत्र आलं, की त्यावर स्वार होऊन मात करणे, हा एकमेव मूलमंत्र घेऊन शेणोली (ता. कऱ्हाड) येथील प्रियांका अविनाश जाधव या अंध युवतीने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशाला गवसणी घातली. तिच्या जिद्दीच्या प्रवासात तिला नुकतेच महसूल सहाय्यक पदाच्या परीक्षेत यश मिळाले आहे.