सातारा : महिलांना प्रशिक्षित करून विकास साधा ; पृथ्वीराज चव्हाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पृथ्वीराज चव्हाण
सातारा : महिलांना प्रशिक्षित करून विकास साधा ; पृथ्वीराज चव्हाण

सातारा : महिलांना प्रशिक्षित करून विकास साधा ; पृथ्वीराज चव्हाण

कऱ्हाड : समाजाच्या प्रगतीत महिलांचे मोठे योगदान आहे. ग्रामीण भागातील महिलांना प्रशिक्षित करून समाजाचा सर्वांगीण विकास साधावा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. कऱ्हाड दक्षिण काँग्रेस समिती आणि सत्यजित पतसंस्थेच्या वतीने आयोजित महिला मेळाव्यात ते बोलत होते.(Great contribution of women in the progress of society)

हेही वाचा: प्रश्‍नपत्रिका कशी मिळवली याबाबत आरोपींकडून समाधान उत्तर नाही

कऱ्हाड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, मेळाव्याचे निमंत्रक पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील, माणदेशी उद्योगसमूहाच्या संस्थापिका चेतना सिन्हा, व्याख्यात्या राणी पाटील, माजी नगराध्यक्षा शारदा जाधव, मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलम येडगे, महिला शहर काँग्रेसच्या अध्यक्षा अर्चना पाटील, जिल्हा परिषद सदस्या मंगल गलांडे, कऱ्हाड दक्षिण महिला काँग्रेसच्या अध्यक्षा विद्या थोरवडे, वारुंजीच्या सरपंच शकुंतला पवार, गोटेच्या सरपंच बानुबी सय्यद, मुख्याध्यापिका विद्या मोरे, स्वाती पिसाळ, पंचायत समिती सदस्या वैशाली वाघमारे, उत्तम पाटील यांच्यासह नगरसेविका, नगरसेवक, महिला उपस्थित होत्या.(Satara news)

हेही वाचा: अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ६७ वे राष्ट्रीय अधिवेशन

सत्यजित पतसंस्थेचे प्रमुख मार्गदर्शक संचालक बाळासाहेब पाटील, उपाध्यक्ष सुधाकर जाधव, संचालक सचिन रैनाक, रवींद्र पाटील, शिवाजी जमाले, सर्जेराव थोरात, जगन्नाथ पाटील, हणमंत भोपते, जगन्नाथ अनुसे, मंदार शिंदे, गंगाराम पवार, दीपक गुरव, संचालिका वैशाली पाटील आदी उपस्थित होते. माणदेशी उद्योगसमूहाच्या संस्थापिका चेतना सिन्हा यांनी कायम कोरडी असणारी माणगंगा नदी प्रवाहित करण्याचे काम हिरिरीने करणारे पृथ्वीराज चव्हाण हे भगीरथ असल्याचे सांगितले. व्याख्यात्या राणी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. स्नेहल पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. कोमल कुंदप यांनी सूत्रसंचालन केले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top