
सातारा : कोल्हापूर सर्किट बेंचच्या इमारत निर्मितीत सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे काम गिनिज बुकमध्ये नोंद करण्यासारखे आहे, असे गौरवोद्गार सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी काढले. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे रविवारी (ता. १७) सरन्यायाधीश गवई यांच्या हस्ते उद्घाटन झाले. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शिवेंद्रसिंहराजेंच्या कामगिरीचे कौतुक केले.