
सातारारोड : सातारा येथील मुख्य टपाल कार्यालयात विविध योजनांमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याबाबतचा मुद्दा विधान परिषदेत उपस्थित करत याप्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली आहे? असा प्रश्न आमदार शशिकांत शिंदे यांनी केला. त्यावर याप्रकरणी संबंधित एजंट व संबंधित अधिकाऱ्यांवर नवी दिल्ली येथे सीबीआयकडे गुन्हा दाखल केला असल्याचे, तसेच संबंधितांची विभागीय चौकशी सुरू असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.