
भोसे :पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त महाबळेश्वर तालुक्यातील गोडवली येथील शिवकालीन तपनेश्वर आणि दांडेघरच्या केदारेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी झाली होती. येथे येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. श्रावण मासातील पहिल्या सोमवारच्या पार्श्वभूमीवर पाचगणी पर्यटनस्थळाला लागूनच असणाऱ्या तपनेश्वर आणि केदारेश्वर या शिवकालीन पुरातन मंदिरात दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक आले होते.