
"Devotees in Pandhe village observe the 350-year-old ‘Ubhya Navratra’ tradition with Akhand Jagdamba Jagar."
Sakal
कवठे : महाराष्ट्राच्या धार्मिक आणि सांस्कृतिक नकाशावर वाई तालुक्यातील पांडे गावाने आपले एक खास व्रत परंपरेनुसार कायम जपले आहे. ‘उभ्याचे नवरात्र’ असे हे व्रत सुमारे साडेतीनशे वर्षांपासून अखंडितपणे सुरू असून, ज्या भक्तांनी ग्रामदैवत काळभैरवनाथाला नवस बोलले आहेत, ते नऊ दिवस सलग उभे राहून आपला नवस पूर्ण करतात.