अजून विधानपरिषद बाकी आहे - धनंजय महाडीक

खासदार धनंजय महाडीक यांचा इशारा ः कऱ्हा़डला कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत
Dhananjay Mahadik on Legislative Council election after rajya sabha election result satara
Dhananjay Mahadik on Legislative Council election after rajya sabha election result sataraesakal

कऱ्हाड : राज्यातील सत्तांतराची स्थिती सर्वांसमोर आहे. विधानपरिषदेची निवडणुक गुप्त मतदान पध्दतीने आहे. राज्यसभा तो झाकी है, विधान परिषद अभी बाकी है, त्यानंतर बरकच काही होईल, असा सूचक इशारा खासदार धनंजय महाडीक यांनी दिला. राज्यसभा निवडणुकीत विजयानंतर येथे ते आले होते. त्यावेळी भाजप पदाधिकार्‍यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. खासदार महाडीक म्हणाले, मी सर्व आमदारांचे आभार मानणार आहे. अपक्षांचे मतदान गुप्त होते. त्यामुळे सर्वांचाच सन्मान झाला पाहिजे. भाजपाचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप, मुक्ताताई टिळक यांची प्रकृती ठिक नसतानाही त्यांनी रुग्णवाहिकेतून येऊन मतदान केले.

त्यामुळे त्यांचे मी प्रथम आभार मानले. या निवडणुकीत एक-एक आमदारांचे मत महत्वाचे होते. आम्हाला 13 ते 14 मतांची संख्या कमी होती. मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी आपल्या कौशल्याने ही बेरीज करून भाजपाचे तीनही उमेदवार निवडून आले. महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी घोडेबाजारासह अन्य केलेली वक्तव्ये

त्यांना नडली. अपक्ष आमदार व घटक पक्षांच्या आमदारांवरही झालेले आरोप व त्यांना मिळालेल्या वागणुकीमुळे आमदार त्रस्त झाले आहेत, ते निकालानंतर जगजाहीर आहे. यामुळे महाविकास आघाडीच्या पदरी अपयश आले. माझ्या विजयामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणाची समीकरणे निश्‍चितपणे बदलली आहेत. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज संस्थामध्ये भाजपाची सत्ता आणण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. संघर्ष हा आमच्या पाचवीला पुजला आहे, तो आम्हाला नवीन नाही. पंतप्रधान नरेंद्र मोंदी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील आमच्या सोबत आहे. याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

संघर्ष आमच्या पाचवीलाच

खासदार महाडीक म्हणाले, संघर्ष आमच्या पाचवीलाच पुजला आहे. निवडणुकीत तीन जूनला अर्ज माघारी घ्यावा लागेल असे वाटले होते. मात्र निवडणूक लागली आणि मतमोजणीवेळी वाट पहावी लागली. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेना 2019 ला एकत्र आली मात्र ती कोल्हापूरमध्ये पूर्वीपासून एकत्रीत आहे. महाडीक विरूद्ध तीन पक्ष असा लढा आहे. भाजपचा कोल्हापूर जिल्ह्यात आमदारांसह खासदार नाही. जिल्हा परिषद आमची सत्ता होती, ती आता नाही. कोल्हापूर महापालिकेत सत्ता नाही आणि म्हणूनच सर्व सत्तास्थाने पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com