Dhangar Society March : पुणे-बंगलोर महामार्गावर धनगर समाजाचा मोर्चा; आंदोलक- पोलिसांत झटापट

धनगर समाजाला अनुसुचित जमाती प्रर्वगात आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज पुणे-बंगलोर महामार्ग दीड तास अडविण्यात आला.
Dhangar Society March
Dhangar Society Marchsakal

खंडाळा - धनगर समाजाला अनुसुचित जमाती प्रर्वगात आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज पुणे-बंगलोर महामार्ग दीड तास अडविण्यात आला.

मात्र, पुणे बाजुकडे असणाऱ्या दुचाकी पुढे जाण्याची संधी मिळताच दुचाकीस्वारांनी पळ काढला. यावेळी आंदोलकांनी रस्त्यावर धिंगाणा घालत गाड्या अडविल्या. यानंतर पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल धस यांनी लक्ष घालत यशस्वी मध्यस्यी केली.

यानंतर सातारा बाजुकडे ही वाहतूक सुरू होणार म्हणुन, काही आंदोलक रस्त्यावरच झोपले. मात्र पोलिसांनी समजूत काढत या आंदोलकांनाही बाजुला काढण्यात आले.

यावेळी आंदोलक यांनी पोलिसांना जाब विचारला. व आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. शेवटी पोलिसांनी यशस्वी मध्यस्ती करत महामार्ग खुला केला. यादरम्यान सातारा बाजुकडील वाहतूक ही सुरळीत झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com