
ढेबेवाडी : साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या शेतीपंपांचे वीजबिल माफ केल्याबद्दल शासनाचे आभार. मात्र, कमी क्षेत्र असतानाही ते ओलिताखाली आणण्यासाठी भौगोलिक अडचणींमुळे जास्त अश्वशक्तीचे पंप वापरण्याशिवाय पर्याय नसलेल्या पाटण तालुक्यातील अन्य शेतकऱ्यांचे काय? त्यांना माफीच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. त्यांच्यावरील अन्याय दूर करावा व त्यांनाही वीजबिल माफीच्या योजनेत समाविष्ट करावे, अशी मागणी ढेबेवाडी व कुंभारगाव विभागातील शेतकऱ्यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे भेटून केली.